IAF Dinner Menu : रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

IAF Viral Dinner Menu: भारतीय सैन्याने या मेनूमधून देखील पाकिस्तानला रोस्ट करण्याची संधी सोडली नाही.
 IAF Viral Dinner Menu
Indian Air Force Dinner MenuX - Social Media
Published on
Updated on

पाकिस्तानने कितीही आदळआपट केली तरी ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्धवस्त झालेले एअरबेस भारतीय सैन्याच्या शौर्याची साक्ष देत राहतील. पाकिस्तान युएनमध्ये देखील युद्ध जिंकल्याचा दावा केला, पण भारतीय प्रतिनिधींची पाकच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला. दरम्यान, अलिकडेच भारतीय वायुसेनेचा दिन साजरा झाला त्यातही भारताने पाकिस्तानला रोस्ट करण्याची संधी सोडली नाही.

भारतीय वायुसेनेचा दिन नुकताच साजरा झाला. वायुसेनेच्या या कार्यक्रमासाठी खास मेनू तयार करण्यात आला होता. या मेनूला पाकिस्तानच्या उद्धवस्त एअरबेसची नावे देण्यात आली होती. भारतीय सैन्याने या मेनूमधून देखील पाकिस्तानला रोस्ट करण्याची संधी सोडली नाही. वायुसेनेचा हा मेनू सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

 IAF Viral Dinner Menu
Konkan Railway: आरक्षित डबा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

मेनूवर भारतीय वायुसेनेची ९३ वर्षे असं लिहण्यात आले आहे. त्याखाली रावळपिंडी चिकन टिक्का मसाला, रफिकी र्हारा मटण, भोलारी पनीर मेथी मलाई, सुकूर शाम सवेरा कोफ्ता, सरगोंदा दाल मखनी, जाकोबाबाद मेवा पुलाव, बहावलपूर नान आणि डेझर्ट्समध्ये बालाकोट तिरामीशू, मुझफराबाद कुल्फी फालुदा आणि मुरिदके मीठा पान असा मेनू देण्यात आला आहे.

 IAF Viral Dinner Menu
Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या या एअरबेसचे मोठे नुकसान झाले होते. भारताने पाकिस्तानमध्ये कारवाई करत नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यानंतर त्याला भारताने जोरदार प्रतित्युत्तर देण्यात आले होते. भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेसचे मोठे नुकसान झाले होते.

पाकिस्तानकडून नुकसान न झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी, भारतीय सैन्य कारवाईत झालेल्या नुकसानीचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे वारंवार समोर आले आहेत. याशिवाय पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानीचे सॅटेलाईट इमेज देखील समोर आल्या होत्या. दरम्यान, आता भारतीय वायुसेनेच्या कार्यक्रमात तयार करण्यात आलेला मेनू चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकरी पाकिस्तानला चांगलेच रोस्ट करत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com