

India vs Australia 1st T20I Called Off: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्याच सामन्यावर पावसाने पाणी फेरले. कॅनबेरामध्ये दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना रद्द (Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदा फलंदाजी करत होती आणि 9.4 षटकांमध्ये 1 गडी गमावून 97 धावा केल्या होत्या. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे नेण्याची तयारी सुरु केली होती, परंतु पावसाने या सगळ्यावर पाणी फेरले. अखेरीस सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसामुळे या सामन्याचे षटक कमी करुन तो 18-18 षटकांचा खेळवला जात होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती. 9.4 षटकांपर्यंत भारताने फक्त 1 विकेट गमावून धावफलकावर 97 धावा लावल्या होत्या. अभिषेक शर्मा 14 चेंडूंमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 19 धावा काढून बाद झाला होता. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर खेळत होते. गिलने 20 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या होत्या, तर सूर्याने 24 चेंडूंमध्ये 34 धावा फटकावल्या होत्या.
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 35 चेंडूंमध्ये 62 धावांची भागीदारी रचली होती. ही भागीदारी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच, पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला आणि त्यानंतर सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. क्रिकेट चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी असली तरी पुढील सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.