लष्करी खर्चात भारत जगात तिसऱ्या स्थानी

अमेरिका, चीन आणि भारताने आपली संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी सर्वाधिक खर्च केला आहे.
Military Tank
Military Tank Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वच देशांमध्ये एकमेकांपेक्षा अधिक शक्तिशाली होण्याची स्पर्धा सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक देश लष्करी खर्चात सातत्याने वाढ करत आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने सोमवारी सादर केलेल्या अहवालानुसार, 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च 2.1 ट्रिलियन डॉलर होता. यादरम्यान अमेरिका, चीन आणि भारताने आपली संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी सर्वाधिक खर्च केला आहे. (India ranks third in military spending in the world)

Military Tank
निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन

मागील वर्षी भारताचा लष्करी खर्च US$ 76.6 अब्ज होता. हा खर्च 2020 च्या तुलनेत 0.9 टक्के आणि 2012 च्या तुलनेत 33% वाढला आहे. अहवालात म्हटले आहे की, स्वदेशी शस्त्रास्त्र उद्योगाला बळकटी देण्यासाठी भारताने 2021 च्या लष्करी बजेटमध्ये अनेक तरतुदी केल्या होत्या. त्याच वेळी, ब्रिटनने गेल्या वर्षी संरक्षणावर $ 68.4 अब्ज खर्च केले, जे 2020 च्या तुलनेत तीन टक्के जास्त आहे.

Military Tank
मोठी कारवाई : अरबी समुद्रात ड्रग्जने भरलेली पाकिस्थानी बोट पकडली

SIPRI ने एका निवेदनात म्हटले आहे की, 2021 मध्ये एकूण जागतिक लष्करी खर्च 0.7 टक्क्यांनी वाढून USD 2113 अब्ज झाला आहे. 2021 मध्ये पाच सर्वाधिक खर्च करणारे देश अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन आणि रशिया (Russia) होते. यांचा एकूण लष्करी खर्च संपूर्ण खर्चाच्या 62 टक्के होता. SIPRI चे वरिष्ठ संशोधक डॉ डिएगो लोपेस दा सिल्वा म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतानाही जागतिक लष्करी खर्च विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com