पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर! भारतीय डिफेन्स सिस्टिमने नष्ट केली चिनी क्षेपणास्त्रे; हवाई दलाच्या प्रमुखांनी स्पष्टच सांगितले

Chinese Missiles Destroyed: हवाई दलाकडून सांगण्यात आले की, 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याने भारताला चोख प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले.
Chinese Missiles Destroyed
Air Marshal AK BhartiDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव काहीसा निवळला आहे. दोन्ही देशातील शस्त्रसंधीनंतर भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी सोमवारी (12 मे) पत्रकार परिषद घेतली. हवाई दलाकडून सांगण्यात आले की, 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याने भारताला चोख प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले. पाकिस्तानकडून भारतावरील हल्ल्यासाठी चिनी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, पण आम्ही हा हल्ला परतवून लावला. आपल्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालीने ही क्षेपणास्त्रे नष्ट केली.

हवाई दलाच्या वतीने माध्यमांना संबोधित करताना एअर मार्शल भारती यांनी सांगितले की, "आम्ही दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ले केले, परंतु पाकिस्तानी सैन्याने ते स्वतःवर घेतले. आमचा उद्देश पाकिस्तानी सैन्याशी युद्ध करणे किंवा त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करणे नव्हता. हे आम्ही आधीच स्पष्ट केले होते.''

Chinese Missiles Destroyed
India Pakistan Ceasefire: शस्त्रसंधीमुळे भारताच्या पदरात काय पडले? पाकिस्तानला कुठला धडा शिकायला मिळाला?

तथापि, यानंतरही पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला आपल्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालीने परतवून लावला. आपल्या हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानने (Pakistan) पाठवलेले तुर्की आणि चिनी ड्रोन आणि रॉकेट पाडले, असेही भारती म्हणाले.

भारती पुढे म्हणाले की, "पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये नूर खान एअरबेस उद्ध्वस्त करुन पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. आम्ही पाकिस्तानी एअरफील्ड उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे, आपल्या सैन्याने भारतीय सीमा न ओलांडता ही कारावाई केली. भारताने या हल्ल्याद्वारे जगातील सर्व देशांना आपली ताकद दाखवून दिली. आम्ही पाकिस्तानला हे स्पष्ट करु इच्छितो की, आम्ही कधीही आणि कुठेही हल्ला करु शकतो."

Chinese Missiles Destroyed
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानकडून काही तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन? श्रीनगरमध्ये ड्रोन दिसल्याचा दावा, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट

भारती शेवटी म्हणाले की, ''आपली सर्व शस्त्रे आणि लढाऊ विमाने पूर्णपणे सुस्थितीत आहेत. एवढचं नाहीतर शत्रूचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.'' रविवारी भारतीय लष्करांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा बुरखा फाडला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने (India) लक्ष्य पूर्णपणे साध्य केले, असेही भारती यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com