India-Maldives: मुइझ्झू नरमले! मालदीवच्या 28 बेटांचे नियंत्रण भारताकडे, चीनवर सरशी

S Jaishankar: नुकतेच जयशंकर आणि परराष्ट्र मंत्री जमीर यांनी संयुक्तपणे, राष्ट्रपती मुइझ्झू यांच्या उपस्थितीत, मालदीवच्या 28 बेटांवर पाणी आणि सीवरेज नेटवर्कच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
India Maldives Relations
India Maldives RelationsEsakal
Published on
Updated on

गेल्या वर्षी भारत आणि मालदीवमधी रजनैतिक संबंध ताणले गेले होते. यानंतर मालदिवला पर्यटनाच्या दृष्टीने मोठा फटका बसला होता. मात्र, यानंतर मालदिवने नमती भूमिका घेतल्यामुळे आता दोन्ही देशांमधील संबंध सुधरत आहेत.

आशात मालदीवने सोमवारी 28 बेटांचे नियंत्रण भारताकडे सुपूर्द केले, ज्यामुळे एक महत्त्वपूर्ण राजनैतिक बदल झाला असून, शेजारील देशांवर नियंत्रण मिळवणाच्या प्रयत्न करत असलेल्या चीनवर भारताने सरशी साधली आहे.

या करारावर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी स्वाक्षरी केली आहे. ते त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला सतत भारतविरोधी भूमिका घेत होते. परंतु आता त्यांनी भारताचे एक महत्त्वाचा मित्र म्हणून संबोधले आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मालदीवला दिलेल्या भेटीनंतर हा करार झाला आहे.

या भागातील चीनच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी भारताचा राजनैतिक विजय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

नुकतेच राष्ट्रपती कार्यालयात, जयशंकर आणि परराष्ट्र मंत्री जमीर यांनी संयुक्तपणे, राष्ट्रपती मुइझ्झू यांच्या उपस्थितीत, मालदीवच्या 28 बेटांवर भारताच्या क्रेडिट लाइन (एलओसी) च्या सहाय्याने पाणी आणि सीवरेज नेटवर्कच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

मालदीवने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

India Maldives Relations
Delhi High Court: ''महिलाही लैंगिक शोषण करु शकते'', POCSO प्रकरणात हायकोर्टाने असे का म्हटले? वाचा संपूर्ण प्रकरण
India Maldives Relations
'दिल्लीतील लोक सभ्य नाहीत', भारतीय लोकांना नावं ठेवणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला उबेर चालकानं झापलं Video

यावेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, "दोन्ही देशांच्या भागीदारीमुळे अनेक प्रकल्प साकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे. भारत विकासाची व्याप्ती वाढवत हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी काम करत आहे. कारण मालदीवसारखी छोटी बेटे हवामान बदलाबाबत संवेदनशील आहेत.

ते पुढे म्हणाले "मालदीवच्या सात टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या २८ बेटांवर 110 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या भारतीय सहकार्याने बांधलेल्या जल आणि स्वच्छता प्रकल्पाचे उद्घाटन करत ते मालदीवला सुपूर्द केले."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com