India Maldives Relations: PM मोदींच्या शपथविधीला मालदीवचे राष्ट्रपती लावणार हजेरी? संबंध सुधारण्याचे होणार प्रयत्न

PM Modi's Swearing-in Ceremony: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी आठवड्याच्या शेवटी नवी दिल्ली येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.
Mohamed Muizzu & PM Modi
Mohamed Muizzu & PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Modi's Swearing-in Ceremony: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमध्ये काही अलबेल नाहीये. मोहम्मद मोइज्जू यांनी मालदीवचे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकल्यापासून भारत-मालदीव संबंधात कटुता आली. मोइज्जू यांनी आपल्या देशात अनेक चीनधार्जिणे धोरणांना हवा दिली. या धोरणांचा परिणाम आपसूकच भारतावर झाला. मात्र आता आलेल्या बातमीने भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुधारु शकतात. होय, तुम्ही ऐकले ते खरे आहे.

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी आठवड्याच्या शेवटी नवी दिल्ली येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. PM मोदी 9 जून रोजी तिसऱ्या टर्मसाठी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रपती मुइज्जू अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह समारंभासाठी 9 जून रोजी नवी दिल्लीला रवाना होतील. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, न्यूज पोर्टल 'एडीशन.एमव्ही'ने आपल्या सिस्टर प्रकाशन 'मिहारु न्यूज'च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तथापि, मुइज्जू यांच्या पहिल्या अधिकृत भारत भेटीबाबत मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Mohamed Muizzu & PM Modi
India Maldives Relations: चीन धार्जीण्या मालदीवला भारताचा मदतीचा हात; जनतेसाठी उचलले 'हे' मोठे पाऊल

पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

तत्पूर्वी, 5 जून रोजी मुइज्जू यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मोइज्जू यांनी ट्विट करत म्हटले होते की, ‘’मोदी, भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा यश मिळाल्याबद्दल अभिनंदन. मी दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी आणि स्थिरतेसाठी शुभेच्छा देतो. भारत आणि मालदीवने आपले हितसंबंध जपले पाहिजेत.’

भारत-मालदीवचे संबंध ताणले गेले

जर मुइज्जू भारत भेटीवर आले तर ती खूप महत्त्वाची भेट असेल. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून चीन समर्थक मुइज्जू यांनी मालदीवच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध खूपच तणावपूर्ण बनले होते. शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी आपल्या देशातून भारतीय लष्करी जवानांना माघार घेण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला मालदीव व्यतिरिक्त बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Mohamed Muizzu & PM Modi
India-Maldivs Relations: ''हट्टीपणा सोडा अन् भारताशी बोला''; मालदीवच्या माजी राष्ट्राध्याक्षांनी चीन समर्थक मुइज्जूला दिला घरचा आहेर

विशेष धोरणानुसार अतिथींची यादी तयार केली आहे

मोदींच्या शपथविधी समारंभासाठी परदेशी नेत्यांची पाहुणे यादी नवी दिल्लीच्या 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाच्या अनुषंगाने आणि हिंद महासागरातील प्रमुख बेट देशांवर लक्ष केंद्रित करुन तयार करण्यात आली आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) 293 जागा जिंकल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Narendra Modi 25 years in government
Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com