World Bank Report 2024: परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा नवा रेकॉर्ड, चीन-मेक्सिकोसारख्या देशांना मागे टाकत भारत नंबर-1; जाणून घ्या

India In World Bank Report: भारतातील लोक जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात. परदेशात राहणारा प्रत्येक भारतीय देशाच्या अर्थव्यवस्थेत आपले योगदान देतो.
World Bank Report 2024: परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा नवा रेकॉर्ड, चीन-मेक्सिकोसारख्या देशांना मागे टाकत भारत नंबर-1; जाणून घ्या
India In World Bank ReportDainik Gomantak

भारतातील लोक जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात. परदेशात राहणारा प्रत्येक भारतीय देशाच्या अर्थव्यवस्थेत आपले योगदान देतो. या परदेशी भारतीयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी यावेळी नवा रेकॉर्ड केला आहे. त्यांनी चीन-मेक्सिकोसारख्या देशांना मागे टाकले आहे.

परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या या रेकॉर्डने जगातील इतर देशही आवाक झाले आहे. खरे तर, परदेशात राहणारे भारतीय आपल्या देशात इतका पैसा पाठवतात ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी पैसे पाठवण्याच्या बाबतीत पुन्हा एकदा सर्वांना मागे टाकले आहे.

परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आश्चर्यकारक कामगिरी केली

गेल्या वर्षी 2023 मध्ये परदेशी भारतीयांनी भारतात 120 अब्ज डॉलर (10,02,821 कोटी रुपये) पाठवले होते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशात पाठवलेल्या पैशाने चीन (China) आणि मेक्सिकोसारख्या देशांना मागे टाकले आहे. याबाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे.

तर पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास, परदेशात राहणारे पाकिस्तानी भारतीयांच्या तुलनेत एक चतुर्थांशही पैसे पाठवत नाहीत. गेल्या वर्षी, परदेशात राहणाऱ्या मेक्सिकन लोकांनी त्यांच्या देशात $66 अब्ज पाठवले होते. तर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी सर्वाधिक रेमिटन्स मायदेशी पाठवला आहे.

World Bank Report 2024: परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा नवा रेकॉर्ड, चीन-मेक्सिकोसारख्या देशांना मागे टाकत भारत नंबर-1; जाणून घ्या
World Bank President Ajay Banga: जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांचा भारत दौरा, जाणून घ्या काय असणार खास?

चीन-मेक्सिको, पाकिस्तान सर्व अपयशी ठरले

परदेशातून पाठवलेल्या रेमिटन्सच्या डेटाबाबत जागतिक बँकेने अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी 2023 मध्ये 120 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतात पाठवली आहे.

याचा गुणाकार केला तर परदेशात राहणारे भारतीय दर मिनिटाला सुमारे दोन कोटी रुपये देशाला पाठवतात. त्याचप्रमाणे मेक्सिकोला 66 अब्ज डॉलर, चीनला 50 अब्ज डॉलर, फिलीपिन्सला 39 अब्ज डॉलर आणि पाकिस्तानला केवळ 27 अब्ज डॉलर्स पाठवले गेले.

World Bank Report 2024: परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा नवा रेकॉर्ड, चीन-मेक्सिकोसारख्या देशांना मागे टाकत भारत नंबर-1; जाणून घ्या
World Bank ने जारी केला रिपोर्ट, भारताच्या GDP वाढीत होऊ शकते मोठी घट!

भारतीय सलग दुसऱ्या वर्षी अव्वल

परदेशातून पैसे पाठवण्याच्या बाबतीत भारतीय सलग दुसऱ्या वर्षी अव्वल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रेमिटन्समध्ये वाढ झाली आहे, 2023-24 मध्ये भारतीयांनी विक्रमी 8.95 लाख कोटी रुपये पाठवले आहेत.

जागतिक बँक (World Bank), यूएन मायग्रेशन एजन्सी आणि आरबीआयच्या अहवालानुसार, हे सलग दुसरे वर्ष आहे जेव्हा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी भारतात $100 अब्जहून अधिक पाठवली आहे. परदेशातून पाठवलेला हा पैसा देशाच्या परकीय चलनाचा साठा वाढवण्याचे साधन आहे. इतकेच नाही तर अनेक लहान देशांसाठी हा देशांतर्गत उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com