Covid Review Meet: विमानतळावर दक्षतेत वाढ; मास्क वापर, चाचण्या वाढविण्याच्या पंतप्रधान मोदींच्या सुचना

अधिकाऱ्यांना कोविड प्रकरणांत हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

Covid Review Meet: जगात अनेक देशात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोविड रूग्णांच्या प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळांवर दक्षता आणि देखरेख वाढवण्यास सांगितले आहे.

कोविड-19 शी संबंधित ताज्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी गुरुवारी हे निर्देश दिले. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जगभरातील कोविडच्या परिस्थितीचे सादरीकरण आरोग्य सचिव, NITI आयोग यांच्यावतीने करण्यात आले.

PM Narendra Modi
Jan Aakrosh Yatra: कोरोनाचा वाढता धोका पाहता भाजपने रद्द केली 75000 किलोमीटरची यात्रा!

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनानुसार, बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व नागरिकांना कोविड रोखण्याच्या दृष्टीने योग्य वर्तनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नेहमी मास्क घालणे समाविष्ट आहे. आगामी सणासुदीचा काळ पाहता हे करणे अधिक गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, लोकांनी कोविड लसीचा तिसरा डोस देखील घेतला पाहिजे.

विशेषत: वृद्धांसाठी आणि संसर्गाची जास्त शक्यता असलेल्यांसाठी हे फार महत्वाचे आहे. पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना कोविड-19 च्या तपासाला गती देण्याचे तसेच व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सिंगसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना गती देण्याचे निर्देश दिले. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नियुक्त केलेल्या INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांना अधिक संख्येने नमुने प्रदान करण्यास सांगितले आहे.

PM Narendra Modi
Governement Jobs: सरकारने विविध रोजगार मेळाव्यातून दिल्या 1.47 लाख नोकऱ्या; मंत्र्यांची राज्यसभेत माहिती

मोदी म्हणाले की, कोविडची महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळांवर देखरेख वाढवावी. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना कोविडशी संबंधित सुविधांचे ऑडिट करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून रुग्णालये, ऑक्सिजन सिलिंडर, PSA प्लांट, डॉक्टर आणि परिचारिकांना व्हेंटिलेटर यासह सर्व आवश्यक संसाधनांची उपलब्धता आणि तयारी सुनिश्चित करता येईल.

देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, कोविड विषाणूचे नवीन प्रकार आणि त्यांचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दलही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की, कोविड महामारीशी संबंधित बाबींमध्ये आपल्याला पूर्णपणे सतर्क राहावे लागेल. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होता कामा नये. बैठकीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितले की, भारतात कोविडच्या नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. देशात कोविडचा सामना करण्यासाठी औषधे, लस आणि रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com