Madrassa: योगींच्या राज्यात आठ वर्षांत एकाही मदरशांची नोंदणी नाही, ७ लाख विद्यार्थ्यांना फटका

विलंबामुळे राज्यातील 5,000 मदरशांमधील 7.5 लाख विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, त्यापैकी 90% पेक्षा जास्त पासमांडा समुदायातील (सर्वात मागासलेले) आहेत.
In Yogi's Uttar Pradesh has not registered a single madrassa in eight years, affecting more than 7 lakh students.
In Yogi's Uttar Pradesh has not registered a single madrassa in eight years, affecting more than 7 lakh students.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

In Yogi's Uttar Pradesh has not registered a single madrassa in eight years, affecting more than 7 lakh students:

योगी सरकारने “चांगल्या सुविधा” देण्याच्या आश्वासनासह गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील मदरशांचे विस्तृत सर्वेक्षण केले होते.

या सर्वेक्षणानंतर 8,000 हून अधिक मदरशे नोंदणीकृत नसलेले आढळले. यापैकी सुमारे 5,000 मदरशांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. जे 2016 च्या सुरुवातीपासून प्रलंबित आहेत.

या प्रकारामुळे 7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे, असे उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष इफ्तिखार अहमद जावेद यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष इफ्तिखार अहमद जावेद यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “आतापर्यंत कोणत्याही मदरशाला बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. यापूर्वीच्या सरकारने सुमारे आठ वर्षांपूर्वी नोंदणी प्रक्रिया थांबवल्याने राज्यातील ५,००० मदरसा अजूनही परवाणगीच्या प्रतीक्षेत आहेत.”

जावेद पुढे म्हणाले की, विलंबामुळे राज्यातील 5,000 मदरशांमधील 7.5 लाख विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, त्यापैकी 90% पेक्षा जास्त पासमांडा समुदायातील (सर्वात मागासलेले) आहेत.

In Yogi's Uttar Pradesh has not registered a single madrassa in eight years, affecting more than 7 lakh students.
Kangana In Politics: सुपरफ्लॉप चित्रपटांच्या षट्कारानंतर, कंगनाला खुणावतेय राजकारणाचे मैदान

“सरकारकडून परवाणगी मिळत नसल्याने मदरसे विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणपत्रे किंवा मान्यताप्राप्त मार्कशीट देऊ शकत नाहीत. अनियमित मदरशांमध्ये आधुनिक विषयांशी जोडून शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि मुलांना मुख्य प्रवाहात आणणे हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते,” असे उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष पुढे म्हणाले.

जमियत उलेमा-ए-हिंदचे उत्तर प्रदेश सचिव, कारी झाकीर हुसेन म्हणाले, “अर्जदार मदरसे परवाणगीसाठी या प्रकरणाशी संबंधीत सर्वांच्या मागे धावत आहेत. परंतु त्यांना कोणही समाधानकारक उत्तर देत नाही. वर्षानुवर्षे अनेक अर्जदारांनी नोंदणीसाठी आपापल्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक कल्याण विभागाकडे संपर्क साधला होता.मात्र, यावरही कोणती कार्यवाही झाली नाही.”

In Yogi's Uttar Pradesh has not registered a single madrassa in eight years, affecting more than 7 lakh students.
"तारीख पे तारीख चालणार नाही," CJI चंद्रचूड वकिलांवर संतापले

हे सर्व प्रकरण आणि परवाणगीसाठी होत असलेल्या विलंबाबद्दल, 'मुस्लिम पसमंदा मंच' चे राज्य समन्वयक झियाउर रहमान म्हणाले, "सरकारने सर्वेक्षण केल्यानंतर मदरशांची यादी अंतिम केली आहे. येत्या काही महिन्यांत त्यांना मान्यता देण्याचे काम सुरू होईल.”

नोव्हेंबर 2022 मध्ये, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने 25,000 हून अधिक मदरशांचे सर्वेक्षण केले, त्यापैकी 8,449 मदरसे कार्यरत आणि मान्यताप्राप्त असल्याचे आढळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Meerut Terrorist Uzaid Whatsapp Chat Leak
Uttar Pradesh BJP Internal Conflict
UP Government Job Character Verification New Rules
ranji trophy elite group match goa vs uttar pradesh