उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत राजकीय खळबळ

उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून राज्यातील मुख्यमंत्रीपदावरती अद्याप निर्णय झालेला नाहीये.
BJP
BJPDainik Gomantak

उत्तराखंडमधील (Uttarakhand) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून राज्यातील मुख्यमंत्रीपदावरती अद्याप निर्णय झालेला नाहीये. त्यातच राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स अजूनही टांगणीवरतीच आहे. याच दरम्यान राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. कारण भाजप हायकमांडने काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत आणि प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांना दिल्लीत बोलावले गेले होते. आज या नेत्यांची दिल्लीत हायकमांडसोबत बैठक होऊ शकते, असेही मानले जात आहे. (In Uttarakhand political tensions remain over the Chief Minister)

BJP
धक्कादायक ! होळीच्या पार्टीत तरुणाने स्वत:च्याच छातीत खुपसला चाकू

प्रत्यक्षात भाजपच्या हायकमांडने राज्यातील मुख्यमंत्र्यांबाबत आपले पत्ते अजून उघडलेले नाहीत. सोमवारी किंवा मंगळवारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. आणि त्याचवेळी राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या सर्व दावेदारांनी दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेऊन आपला दावा पुकारला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2022) पराभूत झालेले काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही मुख्यमंत्रिपदासाठी दावा करत आहेत. त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे देखील दिल्लीत आहेत. धामी यांच्या बाजूने कोश्यारी दिल्लीतील हायकमांडशी संपर्क साधत असल्याची चर्चा रंगत आहे. सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) आणि राष्ट्रीय महासचिव बीएल संतोष यांची भेटही घेतली.

धामी झाले दिल्लीला रवाना

काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी शनिवारी रात्रीच दिल्लीला रवाना झाले आहेत. तर माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत शुक्रवारीच होळी खेळून दिल्लीला झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र यांच्या दिल्ली दौऱ्याने सत्तेच्या गोटात चर्चेला उधाण आले. मात्र याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक हेही शनिवारी सायंकाळी उशिरा दिल्लीला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम धामी आणि कौशिक दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.

BJP
कर्नाटकातील शाळांमध्ये अभ्यासक्रमात होणार भगवद्गीतेचा समावेश

मुख्यमंत्रीपदासाठी तर अनेक दावेदार

मात्र, भाजपने राज्यात कोणाच्याही नावावर शिक्का मारलेला नाहीये. मात्र राज्यात मुख्यमंत्रीपदाचसाठी अनेक दावेदार आहेत. राज्याचे काळजीवाहू सीएम धामी यांच्यासोबतच सतपाल महाराज, धनसिंग रावत, केंद्रीय मंत्री अजय भट्ट, मदन कौशिक आणि भाजपचे राष्ट्रीय मीडियाचे प्रभारी अनिल बलुनी यांचीही नावे आतापर्यंतच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात आले आहे. बलुनी यांचेही नाव मागच्या वेळी समोर आले होते, त्याचबरोबर यावेळीही त्यांचे नाव वेगाने पुढे येत असल्याचे चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com