श्रमजीवी एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा, प्रत्येकी 5 लाखांचा दंडही कोर्टाने ठोठावला

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे श्रमजीवी एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडवणाऱ्या हेलाल आणि नफीकुल या दहशतवाद्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे श्रमजीवी एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडवणाऱ्या हेलाल आणि नफीकुल या दहशतवाद्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (प्रथम) राजेश राय यांनी दोन्ही दहशतवाद्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दोन्ही दहशतवाद्यांना न्यायालयाने 22 डिसेंबर रोजी दोषी ठरवले होते. याआधीही आणखी दोन दहशतवाद्यांना अशाच प्रकारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले होते. एक दहशतवादी यापूर्वीच ठार झाला आहे. अन्य दोन दहशतवाद्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, 2005 मध्ये संध्याकाळी 5:20 वाजता, सिंगरामाऊ आणि हरिहरपूर स्थानकांदरम्यान हरपालगंज क्रॉसिंगवर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला होता. या स्फोटात 14 जणांचा मृत्यू तर 62 जण जखमी झाले होते. ट्रेन गार्ड जाफर अली यांनी 28 जुलै 2005 रोजी रात्री 11:30 वाजता जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान ओबेदुर रहमान उर्फ ​​बाबू भाई रा. कालियानी जिल्हा बागुरा बांग्लादेश, मो. आलमगीर उर्फ ​​रोनी, नफीकुल बिस्वास, सोहाग उर्फ ​​हेलाल, शरीफ उर्फ ​​कांचन उर्फ ​​सैफुद्दीन, गुलाम पजदानी उर्फ ​​याह्या आणि डॉ.सईद यांची नावे समोर आली होती. यामध्ये सईदचा मृत्यू झाला तर दोन आरोपी अद्याप पकडले गेले नाहीत.

Court
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! चहा मिळण्यास उशीर झाल्याने पतीने तलवारीने केली पत्नीची हत्या

दुसरीकडे, रोनी उर्फ ​​आलमगीर आणि ओबैदुर रहमान उर्फ ​​बाबू भाई यांना 2016 मध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 22 डिसेंबर रोजी हेलाल आणि नफीकुल बिस्वास यांना दोषी घोषित करण्यात आले होते. शिक्षेवरील सुनावणीची तारीख 2 जानेवारी निश्चित करण्यात आली होती. 2 जानेवारी रोजी शिक्षेची सुनावणी पूर्ण करताना न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com