श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, 7 वर्षांची मुलगी जखमी

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील सौरा भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलिस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली.
 Jammu and Kashmir
Jammu and KashmirDainik Gomantak

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील सौरा भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलिस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्या सौरा भागात असलेल्या घरावर गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कादरी यांना SKIMS रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याची 7 वर्षांची मुलगीही जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य काश्मीरमधील सौरा भागातील हा पोलिस कर्मचारी आपल्या मुलीसह बाजारातून जात असताना अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि त्यांची मुलगी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर दहशतवादी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांना (Terrorists) पकडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरु केली आहे.

 Jammu and Kashmir
Video: जम्मू-श्रीनगर महामार्गावर बोगद्याचा काही भाग कोसळला, 7 जण अडकले, बचावकार्य सुरू

दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली आहे. जवळपासच्या सर्व नाक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही तपास करुन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सोमवारी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी (Police) सांगितले की, आम्ही लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) पाच अतिरेक्यांना अटक केली होती, त्यापैकी तीन जण गेल्या महिन्यात बारामुल्ला येथील सरपंचाच्या हत्येमध्ये सहभागी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com