कुटुंबसंस्थेत मुलांवर संस्कार केले जातात. मात्र संस्कार करणारेच मुलांचे शोषण करु लागतात तेव्हा मात्र संताप होतो. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये (Karnataka) घडली आहे. समाजात आपण आदर्श मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आसतो. मात्र बंगळूरुमध्ये (Bangalore) घडलेल्या या घटनेने या मूल्यांना तिलांजली दिली की काय असे वाटले तर नवल वाटायला नको.
दरम्यान, मंगळवारी माहिती देताना कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) सांगितले की, बेंगळुरुमधील एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी एक किशोर आणि त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे. तथापि, हे प्रकरण वाटते तितके स्पष्ट नव्हते. या प्रकरणाला कलाटणी मिळाली जेव्हा मुलीने आपल्या वडिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आणले, त्यासाठी तिला वडिलांची हत्या करण्यासाठी तिच्या मित्रांची मदत घ्यावी लागली.
येलाहंका न्यूटाऊन पोलिस पुन्हा तपास करण्यासाठी पोहोचले. सोमवारी पहाटे एका 45 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या घटनेने शहर हादरले. हल्लेखोरांनी दीपकची त्याच्या दोन मुलींसमोरच हत्या केली होती. दीपक मूळचा बिहारचा असून बेंगळुरूमधील GKVK कॅम्पसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होता. एक मुलगी खाजगी महाविद्यालयात तर दुसरी चौथीत शिकत आहे. त्यास दोन बायका होत्या. त्याची पहिली पत्नी बिहारमध्ये राहत होती. तर दुसरी पत्नी कलबुर्गीची होती. या लग्नातून त्यांना दोन मुलीही झाल्या होत्या.
पोलिसांनी पुढे सांगितले की, दीपक आपल्या पहिल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा. त्याने या प्रकाराचा खुलासा आपल्या आईकडेही केला होता. त्यानंतर यावरुन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. मुलीने कॉलेजमधील तिच्या मैत्रिणींसोबत ही गोष्ट शेअर केली होती. घटनेच्या दिवशी सोमवारी पहाटे या नराधमाने मद्यधुंद अवस्थेत पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तिच्या मित्रांशी फोनवरुन संपर्क साधून मदत मागितली. त्यानंतर अन्य चार जणांसह आलेल्या तिच्या मित्राने दीपकवर हल्ला करुन त्याची हत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच पुढील तपास सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.