जामतारा पुन्हा चर्चेत, 'सरकारी शाळांना शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी'

झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात स्थानिक लोकांनी सरकारी नियम मोडून शाळांवर मनमानी नियम लादले आहेत.
Government Schools
Government SchoolsDainik Gomantak
Published on
Updated on

Jamtara Schools: झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात स्थानिक लोकांनी सरकारी नियम मोडून सरकारी शाळांवर मनमानी नियम लादले आहेत. जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये सरकारी नियमानुसार असलेली रविवारची साप्ताहिक सुट्टी बदलून शुक्रवारी देण्यात आली आहे. (In Hundreds Of Government Schools Of Jharkhand There Is A Weekly Holiday On Friday Not Sunday)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिल्ह्यातील काही मुस्लिम तरुणांनी 2-3 शाळांमधून नियम बदलण्यास सुरुवात केली. नंतर ही मनमानी 100 हून अधिक शाळांपर्यंत (Schools) पोहोचली. या तरुणांनी शाळा व्यवस्थापन समितीवरही दबाव टाकला आहे. परिसरात 70 टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे. शाळांमध्ये मुस्लिम मुले जास्त आहेत, त्यामुळे रविवारी अभ्यास होईल आणि शुक्रवारी सुट्टी असेल, असे सांगण्यात आले आहे.

Government Schools
महाराष्ट्रातील वीजबिल स्कॅमचं 'जामतारा कनेक्शन'

शाळेच्या फलकावर 'उर्दू शाळा' असे लिहिले आहे

आश्चर्याची बाब म्हणजे परिसरातील अनेक शाळांच्या फलकांवर 'उर्दू स्कूल' हा शब्द लिहण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र, या शाळांमध्ये ना उर्दू शिकवली जाते ना इथे उर्दू शिक्षक आहे. याबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नाही.

Government Schools
'जामतारा'मध्ये मोठी कारवाई; 'फेक कॉल' करुन लुटणाऱ्या 14 भामट्यांना अटक

असे ट्विट मरांडी यांनी केले आहे

दुसरीकडे, झारखंडचे (Jharkhand) माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी ट्विट करुन हेमंत सोरेन सरकारवर या प्रकरणावरुन हल्ला चढवला. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, 'मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) जी, तुम्ही झारखंडला कुठे नेत आहात? समाजात विष पसरवणाऱ्या अशा असंवैधानिक कृती ताबडतोब थांबवू नका, तर अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करा.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com