भाजप खासदार सतीश गौतम यांचे स्टेजवरच महिला आमदाराशी गैरवर्तन? विरोधकांकडून व्हिडिओ व्हायरल

Satish Gautam Viral Video: या घटनेवरुन, "जर महिला आमदारच सुरक्षित नसतील तर #ModiGovt मध्ये सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल? असा प्रश्न भारत राष्ट्र समितीच्या नेत्याने उपस्थित केला आहे.
In a viral video, BJP MP Satish Gautam is seen touching a female BJP MLA and putting his hand on her shoulder while speaking at an event.
In a viral video, BJP MP Satish Gautam is seen touching a female BJP MLA and putting his hand on her shoulder while speaking at an event.Dainik Gomantak
Published on
Updated on

In a viral video, BJP MP Satish Gautam is seen touching a female BJP MLA and putting his hand on her shoulder while speaking at an event:

सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये आयपी सिंह नावाच्या समाजवादी पक्षाच्या नेत्याने भाजप खासदार सतीश गौतम यांच्यावर महिला आमदाराला छेडल्याचा आरोप केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अलिगडमधील भाजप खासदार सतीश गौतम यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका कार्यक्रमात भाजप खासदार सतीश गौतम महिला भाजप आमदाराच्या शेजारी बसले आहेत. खासदार सतीश गौतम यावेळी आमदार मुक्ता राजा यांना स्पर्श करत आणि खांद्यावर हात टाकून बोलताना दिसत आहेत. पण मुक्ता राजा एकदम अस्वस्थ दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना आयपी सिंह यांनी भाजप खासदार सतीश गौतम यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले,

“अलिगडचे भाजप खासदार सतीश गौतम उघडपणे महिला भाजप आमदार मुक्ता राजा यांची छेड काढत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी ही स्थिती आहे, मग भाजपमध्ये पडद्याआड काय होत असेल.

बेटी बचाओ

बेटी पढ़ाओ …..

च्या जागी बेटी पटाओ ही RSS/भाजपची संस्कृती आहे.

"जर महिला आमदारच सुरक्षित नसतील तर..."

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सतीश गौतम महिला आमदाराच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहेत, ज्यामुळे त्या अस्वस्थ होत आहे. त्यामुळे आमदाराला खुर्ची बदलून स्टेजवरील दुसऱ्या जागेवर जावे लागले. या घटनेदरम्यान भाजपचे बरौलीचे आमदार ठाकूर जयवीर सिंह गौतम यांच्या कृतीकडे पाहताना दिसत आहेत.

भारत राष्ट्र समितीचे नेते वाय सतीश रेड्डी यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर (X) शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले, "जर महिला आमदारच सुरक्षित नसतील तर #ModiGovt मध्ये सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल?

अलिगड #BJP खासदार सतीश गौतम हे भाजप आमदार मुक्ता राजा यांना त्रास देताना दिसत आहेत. यामुळे त्या स्पष्टपणे अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. इथे काय चालले आहे, कोणी समजावून सांगू शकेल का?".

In a viral video, BJP MP Satish Gautam is seen touching a female BJP MLA and putting his hand on her shoulder while speaking at an event.
पतीसोबत नोकरीच्या ठिकाणी राहण्याचा पत्नीचा आग्रह क्रूरता नाही: हायकोर्ट

कार्यक्रमात भाजप नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोळचे आमदार अनिल पराशर यांनी श्री राम बँक्वेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.

यावेळी व्यासपीठावर परिवहन मंत्री दया शंकर सिंह, उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, माजी महापौर शकुंतला भारती, भाजप कार्यकारिणी सदस्य पूनम बजाज आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विजय सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

In a viral video, BJP MP Satish Gautam is seen touching a female BJP MLA and putting his hand on her shoulder while speaking at an event.
"आम्हाला ठार मारा पण परत जाणार नाही..." अवैधपणे पाकिस्तानात घुसलेल्या भारतीय बाप-लेकाचा देश सोडण्यास नकार

अनेकांकडून संताप

हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी भाजप खासदाराच्या या अशोभनीय कृत्यावर जोरदार टीका केली. "हे सुसंस्कृत भाजपचे वास्तव आहे," असे काँग्रेस पक्षाचे नॅशनल मीडिया पॅनेलिस्ट सुरेंद्र राजपूत म्हणाले.

केरळ प्रदेश काँग्रेस सेवादलनेही या घटनेचा निषेध केला आहे. ज्यामध्ये पीडित महिला आमदार सतीश गौतम यांच्या कृत्याचा विरोध करताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com