Remal Cyclone: तेलंगणात 'रेमल' चक्रीवादळाचा कहर; मुसळधार पाऊस आणि वादळात 13 जणांचा मृत्यू

Remal Cyclone: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'रेमल' या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम तेलंगणातही दिसून आला.
Remal Cyclone
Remal CycloneDainik Gomantak
Published on
Updated on

Remal Cyclone: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'रेमल' चक्रीवादळाचा परिणाम तेलंगणातही दिसून आला आहे. रविवारी रात्री राज्याची राजधानी हैदराबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कहर केला. येथे वादळ आणि पावसामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, वीज आणि मोबाईल टॉवरचे नुकसान झाले, वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला. एकट्या नागरकुर्नूल जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू झाला. हैदराबादच्या वेगवेगळ्या भागांतून चार आणि मेडकमधून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

बांधकामाधीन पोल्ट्री शेड कोसळून मृत्यू

दरम्यान, या जोरदार वादळामुळे नागरकुर्नूल, मेडक, रंगारेड्डी, मेडचल मलकाजगिरी आणि नलगोंडा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरकुर्नूल जिल्ह्यातील तंदूर गावात बांधकामाधीन पोल्ट्री शेड कोसळून वडील आणि मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला. मल्लेश (38), त्यांची मुलगी अनुषा (12), मजूर चेन्नम्मा (38) आणि रामुडू (36) अशी मृतांची नावे आहेत. तर चार जण जखमी झाले. याच जिल्ह्यात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघांचा वीज पडून मृत्यू झाला.

Remal Cyclone
Remal Cyclone Alert: बंगालमध्ये वादळाचा धोका! ‘या’ दिवशी धडकणार रेमल चक्रीवादळ; आयएमडीने जारी केला अलर्ट

दोन दुचाकीस्वारांवर झाड कोसळले

हैदराबादच्या (Hyderabad) बाहेरील शमीरपेठमध्ये मोटारसायकलवरुन जात असलेल्या दोन लोकांवर झाड पडले. यामुळे दोघांचा मृत्यू झाला. धनंजय (44) आणि नागिरेड्डी रामी रेड्डी (56) अशी मृतांची नावे आहेत. हैदराबादच्या हाफिजपेट भागात जोरदार वादळामुळे शेजारच्या घराच्या छतावरुन विटा पडल्याने मोहम्मद रशीद (45) आणि मोहम्मद समद (3) यांचा मृत्यू झाला.

महबूबनगर, जोगुलांबा-गडवाल, वानापर्थी, यादद्री-भोंगीर, संगारेड्डी आणि विकाराबाद जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन लाईन तुटल्या. झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्या. खांबांचे नुकसान होऊन ते उन्मळून पडले. काही ठिकाणी होर्डिंग्ज आणि मोबाईल टॉवर रस्त्यावर आणि घरांवर पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com