कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेने कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे निराश होऊन एका व्यक्तीने बँकेला आग लावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून कागिनेली पोलिस (Police) ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 436, 477, 435 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला बँकेतून (Bank) कर्ज घ्यायचे होते, त्यासाठी त्याने बँकेत अर्ज केला होता. मात्र, बँकेने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याचा कर्ज अर्ज फेटाळला. (Karnataka News In Marathi)
कागिनेले पोलिसांच्या हद्दीतील हेदुगोंडा गावात असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेतून मुल्लाने कर्ज मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. बँकेने त्याचा अर्ज फेटाळला कारण त्याचा CIBIL स्कोर कमी होता. कर्जाचा अर्ज फेटाळल्याने संतापलेल्या मुल्लाने शनिवारी रात्री उशिरा बँकेची शाखा गाठली. त्यांनी खिडकी तोडून बँकेच्या कार्यालयात पेट्रोल टाकले. त्यानंतर त्यानी कार्यालयाला आग लावली. ये-जा करणाऱ्यांनी धूर दिसला आणि पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना खबर दिली.
या आगीत 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच संगणक, पंखे, दिवे, पासबुक प्रिंटर, कॅश मोजण्याचे यंत्र, कागदपत्रे, सीसीटीव्ही, कॅश काउंटर नष्ट करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांनुसार कागिनेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या आत आग लागल्याने ग्रामस्थांचे आग विझवण्याचे प्रयत्न फलदायी ठरले नाहीत. हावेरी येथील अग्निशमन दलाने तातडीने गावात धाव घेत आग आटोक्यात आणली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.