ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

ICC T20 Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) च्या ताज्या T20 क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे.
ICC T20 Rankings Top Abhishek Sharma
Abhishek SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

ICC T20 Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) च्या ताज्या T20 क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे. सध्या सुरु असलेल्या आशिया चषकातील सामन्यांचा थेट परिणाम या रँकिंगवर झाला आहे. एकीकडे टीम इंडियाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा आपले पहिले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसरीकडे इंग्लंडच्या फिल साल्ट ने मोठी झेप घेतली आहे. मात्र, भारताचेच अन्य फलंदाज तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांना या क्रमवारीत मोठा फटका बसला आहे.

अभिषेक शर्माचा नवा रेकॉर्ड

भारताचा (India) स्टार युवा फलंदाज अभिषेक शर्माने आयसीसी T20 क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली छोटी पण आक्रमक खेळी त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरली. आता त्याचे रेटिंग 884 झाले असून हे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोच्च रँकिंग आहे. या कामगिरीसह त्याने एक नवा रेकॉर्डही आपल्या नावावर केला.

ICC T20 Rankings Top Abhishek Sharma
ICC T20 Rankings: हार्दिकचा जलवा जलाल! पुन्हा बनला नंबर-1 टी-20 ऑलराऊंडर; तिलकने SKY आणि बाबरला सोडले मागे

यादरम्यान, इंग्लंडचा (England) स्टार फलंदाज फिल साल्टने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावले, ज्याचा त्याला मोठा फायदा झाला. तो एका स्थानाची झेप घेत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. फिल साल्टचे रेटिंग आता 838 झाले आहे.

ICC T20 Rankings Top Abhishek Sharma
ICC Ranking: शुभमनला मागे सोडत बाबर आझम पुन्हा वनडेत नंबर वन; रवी बिश्नोईची T20 मधील बादशाहत संपुष्टात

भारतीय फलंदाजांना फटका

इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर देखील आयसीसी T20 क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यालाही एक स्थानाचा फायदा झाला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या दमदार फलंदाजीमुळे त्याला ही बढती मिळाली. बटलरचे रेटिंग आता 794 झाले. याउलट, भारतीय फलंदाजांसाठी ही क्रमवारी थोडी निराशाजनक ठरली. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्याचे रेटिंग सध्या 792 एवढे आहे. तर ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेड पाचव्या क्रमांकावर कायम आहे. श्रीलंकेचा पथुम निसंका एका स्थानाचा फायदा घेऊन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याचे रेटिंग 751 झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com