World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Women's Cricket World Cup 2025: भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या महिला विश्वचषक 2025 साठी जोरदार तयारी सुरु आहे.
Women's Cricket World Cup 2025
World Cup 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Women's Cricket World Cup 2025: भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या महिला विश्वचषक 2025 साठी जोरदार तयारी सुरु आहे. स्पर्धेतील सर्व संघांची घोषणा आधीच करण्यात आली. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या विश्वचषकासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विश्वचषक सामन्यांचे संचालन फक्त महिला अधिकारी करणार असल्याची घोषणा आयसीसीने केली आहे. हा निर्णय केवळ एक मोठी उपलब्धी नसून क्रिकेटमधील लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी आयसीसीची असलेली कटिबद्धता दर्शवतो.

आयसीसीने यासाठी खास महिला अधिकाऱ्यांचे पॅनेल जाहीर केले. या पॅनेलमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर्सचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.

Women's Cricket World Cup 2025
ODI World Cup 2025: खुशखबर...! वर्ल्ड कपचे सामने पाहा फक्त 100 रुपयात, तिकीट कसे बुक कराल? जाणून घ्या A टू Z माहिती

जीएस लक्ष्मी आणि वृंदा राठींचा समावेश

आयसीसीने (ICC) घोषित केलेल्या चार सदस्यीय मॅच रेफरींच्या पॅनेलमध्ये भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू आणि पहिली महिला मॅच रेफरी जी.एस. लक्ष्मी यांचा समावेश आहे. त्यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या ट्रूडी अँडरसन, दक्षिण आफ्रिकेच्या शैंड्रे फ्रिट्ज आणि मिशेल परेरा यांसारख्या अनुभवी महिला रेफरीही या पॅनेलमध्ये असणार आहेत.

अंपायरिंग पॅनेलमध्येही अनेक अनुभवी आणि नव्या महिला अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसेक, जॅकलिन विल्यम्स आणि सू रेडफर्न ही त्रिकूट त्यांच्या तिसऱ्या महिला विश्वचषकात अंपायरिंग करतील. लॉरेन एजेनबैग आणि किम कॉटन दुसऱ्यांदा विश्वचषकाचा भाग असतील. विशेष म्हणजे, अंपायरिंग पॅनेलमध्ये भारताच्या तीन माजी महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. वृंदा राठी, एन. जननी आणि गायत्री वेणुगोपालन यांना या विश्वचषकात अंपायरिंग करण्याची संधी मिळाली आहे.

आयसीसीच्या या निर्णयावर बोलताना आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले की, "मॅच अधिकाऱ्यांच्या पॅनेलमध्ये केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असणे ही केवळ एक मोठी उपलब्धी नाही, तर क्रिकेटमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याबद्दल आयसीसीची वचनबद्धता दर्शवते. हा निर्णय महिलांना संधी देण्याबद्दल आणि असे आदर्श निर्माण करण्याबद्दल आहे, जे भावी पिढ्यांना प्रेरित करु शकतील."

Women's Cricket World Cup 2025
ODI World Cup 2025: एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना टीम इंडियाला तगडा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी

मॅच रेफरी:

  • ट्रूडी अँडरसन

  • शैंड्रे फ्रिट्ज

  • जीएस लक्ष्मी

  • मिशेल परेरा

अंपायर:

  • लॉरेन एजेनबैग

  • कॅन्डेस ला बोर्डे

  • किम कॉटन

  • सारा दंबनेवाना

  • शथिरा जाकीर जेसी

  • केरिन क्लास्टे

  • जननी एन

  • निमाली परेरा

  • क्लेअर पोलोसक

  • वृंदा राठी

  • सू रेडफर्न

  • एलोइस शेरिडन

  • गायत्री वेणुगोपालन

  • जॅकलीन विल्यम्स

Women's Cricket World Cup 2025
World Cup 2025: वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, 'या' युवा खेळाडूकडे संघाची कमान, संघात कोण-कोण?

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज

विश्वचषक 2025 साठी भारतीय संघाची जबाबदारी हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खांद्यावर आहे, तर उपकर्णधारपदाची भूमिका स्मृती मानधना पार पाडणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून विश्वचषकात एक दमदार सुरुवात करण्याकडे संघाचे लक्ष असेल.

भारतीय महिला संघाने आजवर एकदाही महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलेले नाही. घरच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत हा दुष्काळ संपवण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. या स्पर्धेत भारताला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. महिला क्रिकेटचा वाढता चाहतावर्ग आणि आयसीसीच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे विश्वचषक 2025 एक अविस्मरणीय स्पर्धा ठरेल अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com