केंद्र सरकारला 'सहकाराचं साकडं' घालणार, सकाळ महा कॉन्क्लेव्हमध्ये शरद पवारांचं आश्वासन

सहकार क्षेत्रातील लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे ही शोकांतिका असल्याचे मत देखील शरद पवारांनी (Sharad Pawar) मांडलं आहे.
I will demand Central government to support Cooperative sector says Sharad Pawar in Sakal Maha Conclave
I will demand Central government to support Cooperative sector says Sharad Pawar in Sakal Maha Conclave Dainik Gomantak
Published on
Updated on

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा कॉन्क्लेव्ह नागरी व जिल्हा सहकारी पतसंस्थांची 3 दिवसीय महापरिषदेला कालपासून सुरूवात झाली आहे.या सहकार परिषदेचा आज दुसरा दिवस पार पडला. पुण्यात दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सहकार आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित अनेक सेशन्स पार पडले . आज झालेल्या या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू होते ते देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्टवादीचे सर्वासार्वे शरद पवार.(I will demand Central government to support Cooperative sector says Sharad Pawar in Sakal Maha Conclave)

I will demand Central government to support Cooperative sector says Sharad Pawar in Sakal Maha Conclave
राजकीय फायद्यासाठी काँग्रेसची राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड,पियुष गोयलांचा हल्लाबोल

सकाळ समूहाच्या सहकार संबंधित या कार्यक्रमात सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील निगडित अनेक मुद्द्यांवरती चर्चा होत आहे. डबघाईला आलेल्या सहकार क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी काय करता येईल यावर तज्ञांच मार्गदर्शन लाभत आहे. आज झालेल्या पहिल्या सत्रात ऑनलाईन पेमेंट करताना आणि इतर सायबर क्राईम मधून होणाऱ्या फसवणुकीबद्दल सायबरचे अप्पर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांचे सायबर सेक्युरिटी इन बँकिंग या विषयावर मार्गदर्शन झाले. तर या नंतरच्या सेशन मध्ये शरद पवार यांनी सहकाराबद्दल आपला अनुभव, सहकार क्षेत्रासाठी नवीन योजना याबद्दल आपले मार्गदर्शन केले त्यांनतर ते उपस्थितांशी संवाद देखील साधला.

याच सहकार परिषदेत शरद पवार यांनी सहकाराच्या समोरच्या अडचणी सांगतानाच महाराष्ट्र, गुजरात या राज्यात सहकाराचं मोठं काम असून सहकार संस्था उभारण्यासाठी अंनेकांनी आपली हयात घातली मात्र आता चित्र वेगळे आहे सहकार क्षेत्रात सध्या खूप अस्वस्थता वाढली असल्याची चिंता देखील त्यांनी बोलावून दाखवली आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रांसाठी रिझर्व बँकेने काही सूचना केल्या आहेत संचालक मंडळाचे दोन भाग होतील सर्व अधिकार रिझर्व बँकेला गेले तर संचालक मंडळाने काय करायचं असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे. सहकार क्षेत्रातील लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे ही शोकांतिका असल्याचे मत देखील त्यांनी मांडलं आहे.

I will demand Central government to support Cooperative sector says Sharad Pawar in Sakal Maha Conclave
भवानीपूरमध्ये 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय

त्याचबरोबर केंद्र सरकारला सहकाराबाबत मदतीचं साकडं घालण्यासाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे असे आश्वासन देखील शरद पवारांनी राज्यातील सहकार संस्थाना दिले आहे.

तसेच अमित शहा यांचं सहकारी बँका संदर्भात धोरण अनुकूल राहील असं मला वाटतं ते अहमदाबाद सहकारी बँकेचे संचालक होते आमच्यासारखे लोक अमित शहा यांच्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे सहकाराला कुठलाही धोका निर्माण होणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी या सहकार परिषदेत मांडलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com