Navy Chief Admiral R Hari Kumar
Navy Chief Admiral R Hari KumarDainik Gomantak

Agnipath: 'एवढा विरोध होईल वाटलं नव्हतं...', नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

केंद्र सरकारने देशाच्या तिन्ही सैन्य दलांसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागांतून तीव्र विरोध होत आहे.
Published on

Agnipath Scheme Protest: केंद्र सरकारने देशाच्या तिन्ही सैन्य दलांसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागांतून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारीही बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये निदर्शने आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या. अग्निपथ योजनेच्या विरोधात नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार (Navy Chief Admiral R Hari Kumar) यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. नौदल प्रमुख म्हणाले की, आम्हाला या योजनेवर इतक्या व्यापक हिंसक निषेधाची अपेक्षा नव्हती.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नौदल प्रमुख म्हणाले, 'मला अशा प्रकारच्या निषेधाची अपेक्षा नव्हती. आम्ही अग्निपथ योजनेवर सुमारे दीड वर्ष काम केले...'. अग्निपथ योजनेबद्दल बोलताना अ‍ॅडमिरल कुमार पुढे म्हणाले, ही 'मेड इन इंडिया' आणि 'मेड फॉर इंडिया' योजना आहे.

Navy Chief Admiral R Hari Kumar
Shafiqur Rahman Barq: सपा खासदाराने पीएम मोदींवर केले वादग्रस्त वक्तव्य

'योजना समजून घेणे महत्त्वाचे'

योजना मागे घेण्याची मागणी करणाऱ्या तरुणांच्या देशभरातील निषेधादरम्यान, नौदल प्रमुख म्हणाले, "मी लोकांना आंदोलन करु नका आणि हिंसक होऊ नका असे सांगू इच्छितो. त्यांनी योजना समजून घेऊन शांतता राखली पाहिजे. तरुणांना देशसेवेची ही उत्तम संधी आहे.''

Navy Chief Admiral R Hari Kumar
"हर कदम पर साथ खड़ा हूं..": या भाजप खासदाराने आंदोलकांच्या बाजूने केले ट्वीट

चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती

लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या कालावधीसाठी सैनिकांची भरती करण्याच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बुधवारपासून अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरु आहेत. चार वर्षांच्या सेवेनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या 75 टक्के सैनिकांना (Soldiers) ग्रॅच्युइटी आणि पेन्शन लाभाशिवाय सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल.

24 जूनपासून भरती सुरु होणार

अग्निपथ योजनेंतर्गत 24 जूनपासून हवाई दलातील निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. हवाईदल प्रमुख व्ही. आर चौधरी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की, '2022 साठी, अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी (Armed Forces) वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे, ज्यामुळे तरुणांचा एक मोठा वर्ग सशस्त्र दलात भरतीच्या नवीन 'मॉडेल'मध्ये सामील होऊ शकतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com