Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात (SC) मंगळवारी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश (CJI) D.Y. चंद्रचूड आणि वकील यांच्यात एक रंजक संवाद झाला. खरे तर, 'इंडस्ट्रियल लिकर'शी संबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकिलाने आपल्या कलरफुल केसांसाठी सरन्यायाधीशांची माफी मागितली. होळीचा संदर्भ देत वकिलाने सांगितले की, त्यांच्या कलरफुल केसांसाठी त्यांना माफ करावे. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गंमतीने विचारले की, केसांचा लिकरशी काही संबंध नाही ना?
"मी माझ्या कलरफुल केसांबद्दल माफी मागतो. हे होळीमुळे घडले. जेव्हा आपल्या आजूबाजूला बरीच मुले असतात तेव्हा असे घडते," असे वकील महोदय म्हणाले. बार आणि बेंचच्या अहवालानुसार. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हसून विचारले की, "याचा लिकरशी काही संबंध नाही ना?" यावर वकिलाने हसत उत्तर दिले. ते म्हणाले की, "हाहा, आहे. मी व्हिस्कीचा फॅन आहे."
वकील महोदय पुढे म्हणाले की, "नऊ न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करणे, तेही पेपरलेस कोर्टात, माझ्यासाठी आव्हान आहे, मी लॉर्ड." यावर सरन्यायाधीश हसून म्हणाले की, "असं काही नाही, यामुळे तर काम आणखी सोपे होते. तुम्ही सहज एका पानावरुन दुसऱ्या पानावर जाऊ शकता." त्यावर वकील महोदय म्हणाले की, "आपल्या वयानुसार तर ठीक आहे, पण..." यावर सरन्यायाधीश म्हणाले की, "काय म्हणताय?" सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती.
दरम्यान, दोन लिकर कंपन्यांमधील ट्रेडमार्क उल्लंघनाच्या वादाच्या सुनावणीदरम्यान अशाप्रकारची मजेदार घटना पाहायला मिळाली. दुसरीकडे, सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बॉटल्स सादर करण्यात आल्या. या बॉटल्स ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सीजेआयसमोर सादर केल्या. सीजेआय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील अपीलावर सुनावणी सुरु होती. यामध्ये, इंदूरस्थित कंपनी जेके एंटरप्रायझेसला लंडन प्राईड नावाने बेवरेज बनवण्यापासून रोखण्याचे मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डची याचिका फेटाळण्यात आली.
याच सुनावणीदरम्यान दोन्ही बॉटल्स CJI आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्यासमोर सादर करण्यात आल्या. यानंतर सरन्यायाधीश मोठ्याने हसले आणि म्हणाले की, तुम्ही बॉटल्स का आणल्या आहेत? नंतर सरन्यायाधीशांना विचारण्यात आले की, ते सादर केलेल्या दोन्ही बॉटल्स घेऊ शकतात का? यावर सरन्यायाधीशांनी हसत हसत उत्तर दिले की, हो कृपया घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.