Viral Video: 60 सेकंदात साधला डाव...! मेहनतीने घेतलेली 'क्रेटा' चोरट्यांनी पळवली; धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

Shocking Car Theft Video: राजधानी दिल्लीत चोरीची एक घटना उघडकीस आली, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. अवघ्या 60 सेकंदात चोरट्यांनी हुंडई क्रेटा चोरली.

Shocking Car Theft Video:
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Shocking Car Theft Video: राजधानी दिल्लीत चोरीची एक घटना उघडकीस आली, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. अवघ्या 60 सेकंदात चोरट्यांनी हुंडई क्रेटा चोरली. होय, फक्त एका मिनिटात चोरट्यांनी कारची सुरक्षा भेदून ती गायब केली. आजकाल कार उत्पादक कंपन्या खूप प्रगत तंत्रज्ञान वापरतात आणि उत्कृष्ट सुरक्षेचा दावा करतात. पण या चोरांसमोर सर्व सुरक्षा निरुपयोगी ठरली. सध्या या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!


Shocking Car Theft Video:
Viral Video: 'प्रमोद सावंत राजीनामा द्या'; कपडे काढून मुरगावात एकजण पावसाच्या पाण्यात लोळला; व्हिडिओ व्हायरल

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

दरम्यान, सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये राहणारा ऋषभ चौहान याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, 21 जून रोजी सकाळी पार्क केलेल्या क्रेटाजवळ एक कार येते. त्यातून एक माणूस बाहेर उतरतो, ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी तोडतो आणि नंतर निघून जातो. काही मिनिटांनंतर तीच कार पुन्हा परत येते. यावेळी एक मास्क घातलेला माणूस कारमधून (Car) उतरतो, कारची सुरक्षा व्यवस्था हॅक करतो आणि काही सेकंदात कार अनलॉक करतो.

कार मालकाने कंपनीवर नाराजी व्यक्त केली

ऋषभने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ''21 जून 2025 रोजी माझी ह्युंदाई क्रेटा 60 सेकंदात चोरीला गेली. सीसीटीव्ही फुटेजवरुन हे स्पष्ट होते की क्रेटाची सुरक्षा व्यवस्था आता सुरक्षित नाही. ती काही मिनिटांत हॅक होऊ शकते. जे क्रेटा खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी सावधगिरी बाळगा. ह्युंदाई इंडिया, तुम्हाला तुमचे सुरक्षा सॉफ्टवेअर अपग्रेड करावे लागेल. दिल्ली पोलिसांना अद्याप कार सापडलेली नाही. " तो पुढे म्हणाला की, "जर दिल्लीत ही परिस्थिती असेल तर मी इतर ठिकाणच्या परिस्थितीची कल्पनाही करु इच्छित नाही."


Shocking Car Theft Video:
Viral Video: पठ्ठ्याची जुगाडू बाईक अन् स्टाईलनं वेधलं लक्ष... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; एकदा बघाच!

ऋषभने एका ईमेलचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांनी तपास सुरु झाल्याची पुष्टी केली आहे. ही पोस्ट आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे आणि 2500 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. काही लोकांनी तारखेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काहींनी स्थानिक पोलिसांवर (Police) किंवा निवासी क्षेत्रातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर शंका व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com