''इथं देह व्यापार लीगल...''; डॉक्टर नवऱ्याची दादागिरी, हुंडा म्हणून बायकोकडे मागितले 1 कोटी

Madhya Pradesh Crime: हुंड्यासाठी छळ केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आली आहे.
Crime
CrimeDainik Gomantak

Madhya Pradesh Crime: हुंड्यासाठी छळ केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आली आहे. जर्मनीत राहणाऱ्या एका डॉक्टरवर त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जर्मनीहून इंदूरला परतलेल्या महिलेने पतीवर गंभीर आरोप केले असून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना (Police) सांगितले की, लग्नानंतर ती जेव्हा जर्मनीला गेली तेव्हा तिच्या डॉक्टर पतीने अनेक मागण्या केल्या. मात्र त्या पूर्ण करणे तिला शक्य झाले नाही त्यामुळे तिला भारतात परतावे लागले. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. लग्नानंतर ती आपली संपत्ती आहे आणि आता तो तिला हवा तसा वापरु शकतो, असेही तिने सांगितले.

Crime
Madhya Pradesh Crime: दुसऱ्याशी केलं लग्न, 23 वर्षीय एक्स गर्लफ्रेंडवर 8 मित्रांसह प्रियकराचा सामूहिक बलात्कार

डॉक्टर पतीने एक कोटी रुपये हुंडा मागितला

फिर्यादीत पत्नीने पोलिसांना सांगितले की, पतीने तिला सांगितले की जर्मनीमध्ये देह व्यापार लीगल आहे, त्यामुळे तिने ते करावे आणि त्याच्यासाठी पैसे कमवावे. मात्र यासाठी पतीला विरोध केला असता त्याने तिला 31 जानेवारी 2024 रोजी भारतात परत पाठवले. जेव्हा पीडितेने तिच्या घरी संपूर्ण हकिकत सांगितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले आणि विजय नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

Crime
Madhya Pradesh Crime: अर्धनग्न अवस्थेत आढळली तरुणी... होणाऱ्या नवऱ्याने केला घात!

पतीने तिच्यावर वेश्याव्यवसायासाठी दबाव टाकला

याबाबत पोलीस उपायुक्त अभिषेक आनंद यांनी सांगितले की, पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात आली आहे, तिचा पती जर्मनीत (Germany) राहतो. हुंड्यासाठी मारहाण आणि शारीरिक शोषणाअंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com