मोबाईल लॅपटॉपला कसा कनेक्ट करावा?

मोबाईल लॅपटॉपला जोण्याच्या सोप्या स्टेप्स
how to connect mobile with laptop

how to connect mobile with laptop

Dainik Gomantak

Published on
Updated on

इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी किंवा फोटो, फाइल्स शेअर करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनला आपल्या लॅपटॉप किंवा पीसीशी कसे कनेक्ट करावे याबद्दल आपल्याला कधी कधी माहिती नसते. स्मार्टफोनला लॅपटॉप किंवा पीसीशी वायर्ड आणि वायरलेस अशा दोन्ही प्रकारे कनेक्ट केले जाऊ शकते. तेव्हा जाणून घेवूया स्मार्टफोनला लॅपटॉप किंवा पीसीशी कनेक्ट करण्याच्या स्टेप्स...

इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी मोबाइलला लॅपटॉपशी जोडावे

मुख्यतः, तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपशी कनेक्ट करण्यासाठी आणि इंटरनेट शेअर करण्यासाठी तुम्ही दोन ऑप्शन आहेत. यामध्ये वायर्ड कनेक्शन आणि वायरलेस असे दोन प्रकार आहेत. तुम्ही हे करण्यासाठी USB केबल आणि मोबाईल हॉटस्पॉट वापरू शकता आणि तुमच्या लॅपटॉपवर इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.

  • यूएसबी केबलद्वारे इंटरनेट कनेक्ट करा

  • पहिल्यांदा तुम्हाला तुमचा Android स्मार्टफोन तुमच्या लॅपटॉपशी USB केबलद्वारे जोडणे आवश्यक आहे .

  • जेव्हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर परवानगीसाठी मॅसेज दिसेल तेव्हा तुम्हाला “Accept” वर टॅप करून परवानगी द्यावी लागेल .

  • आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरील सेटिंग अॅपवर जावे लागेल.

  • वाय-फाय आणि नेटवर्क या ऑप्शनवर टॅप करून Hotspot & tethering सिलेक्ट करावे लागेल.

  • तुम्हाला USB tethering ऑप्शनवर स्क्रोल करणे गरजेच आहे.

  • तुम्ही पाहू शकता की तुमचा लॅपटॉप आता इंटरनेटशी कनेक्ट झाला आहे

<div class="paragraphs"><p>how to connect mobile with laptop</p></div>
Mobile सतत हँग होत असेल तर वापरा 'या' टीप्स

Wi-Fi हॉटस्पॉट द्वारे इंटरनेट शेअर करा

  • येथे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरील (Android किंवा iOS) सेटिंग अॅपवर जाण्याची आवश्यकता आहे .

  • वाय-फाय आणि नेटवर्क पर्यायावर क्लिक करा .

  • Hotspot & tethering सिलेक्ट करा

  • आता तुम्हाला वाय-फाय हॉटस्पॉट निवडणे आणि फिचर्स टॉगल करणे आवश्यक आहे .

  • त्याच मेनूवर, आपण हॉटस्पॉटचे नाव आणि पासवर्ड पाहू शकता .

  • आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर वाय-फाय कनेक्शन शोधावे लागेल आणि हॉटस्पॉट नाव सिलेक्ट करून क्लिक करावे लागेल.

  • तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या हॉटस्पॉट मेनूवर पासवर्ड टाकावा लागेल.

  • सर्व्हर कनेक्ट झाल्यावर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर वायरलेस पद्धतीने इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.

फोटो शेअर करण्यासाठी मोबाइलला लॅपटॉपशी कसा कनेक्ट करावा

तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपशी कनेक्ट करणे आणि USB केबलद्वारे फोटो आणि व्हिडिओ हस्तांतरित करणे हा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे कारण दोन उपकरणांमधील कनेक्शन कट होण्याची शक्यता खूप कमी असते. शिवाय, फोनवरून लॅपटॉप किंवा पीसीवर फोटो आणि व्हिडिओ हस्तांतरित करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

  • प्रथम, तुम्हाला तुमचा फोन USB केबलद्वारे लॅपटॉपशी जोडणे आवश्यक आहे .

  • सहसा, जेव्हा तुम्ही स्मार्टफोनला लॅपटॉपशी कनेक्ट करता तेव्हा ते डीफॉल्टनुसार चार्जिंग मोडवर जाते.

  • तर इथे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरील नोटिफिकेशन बार खाली स्क्रोल करावा लागेल जिथे तुम्हाला Android सिस्टम नावाचा टॅप दिसेल .

  • तुम्ही ते पाहू शकता की ते 'केबलद्वारे हे डिव्हाइस चार्ज होत आहे'.

  • आता त्या पर्यायावर टॅप करा .

  • हे तुम्हाला USB नावाच्या मेनूकडे घेऊन जाईल .

  • या मेनू अंतर्गत, तुम्हाला फाइल ट्रान्सफरवर टॅप करणे आवश्यक आहे .

  • तुमच्‍या लॅपटॉप स्‍क्रीनवर, तुम्‍हाला स्‍मार्टफोनवरील फाईल दाखवणारी एक नवीन विंडो पॉप अप होताना दिलेस.

  • तुमच्या स्मार्टफोनवरील सर्व फोटो ऍक्सेस करण्यासाठी DCIM पर्यायावर क्लिक करा आणि Photos निवडा .

  • तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून कोणताही फोटो ट्रान्सफर करू शकता

<div class="paragraphs"><p>how to connect mobile with laptop</p></div>
रिलायन्स जिओचे नेटवर्क बंद, नेटकऱ्यांची सोशल मिडियावर फटकेबाजी

फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी मोबाइलला लॅपटॉपशी कसे कनेक्ट करावे

मोबाईलवरून लॅपटॉपवर फाइल्स ट्रान्सफर करणे ही देखील फोटो आणि व्हिडिओ ट्रान्सफर सारखीच प्रक्रिया आहे. युजर्स मेलद्वारे फाइल पाठवू शकतात आणि ती थेट त्यांच्या लॅपटॉपवर उघडू शकतात, परंतु यामुळे क्लाउड स्टोरेज स्टोर होवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा डेटा सेव्ह करायचा असेल तर मोबाइल फोनवरून लॅपटॉपवर फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी USB केबल्स हा सर्वोत्तम मार्ग आहे. येथे काही सोप्या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला स्मार्टफोनवरून लॅपटॉपवर फाइल्स ट्रान्सफर करण्यात मदत करतील.

  • सर्वप्रथम, यूएसबी केबलच्या मदतीने , तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपशी जोडणे आवश्यक आहे.

  • आता, तुमच्या स्मार्टफोनवर सेटिंग अॅपवर जा आणि सर्च बारवर टॅप करा.

  • तुम्हाला USB Preferences शोधावा लागेल आणि तो सिलेक्ट कारावा लागेल.

  • या अंतर्गत, तुम्हाला फाइल ट्रान्सफरवर टॅप करणे आवश्यक आहे .

  • तुमच्‍या लॅपटॉप स्‍क्रीनवर, तुम्‍हाला स्‍मार्टफोनवरील फाईल दाखवणारी एक नवीन विंडो पॉप अप होतांना दिसेल.

  • येथून तुम्ही तुमच्या लॅपटॉप स्क्रीनवर थेट तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये एंट्री करू शकता आणि तुमच्या फोनवरून कोणतीही फाइल तुमच्या लॅपटॉपवर किंवा लॅपटॉपवरून फोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com