New Ration Card : नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा अन् कुठे करायचा? कागदपत्रं कोणती लागणार? जाणून घ्या

Ration Card Apply: रेशन कार्ड हे भारत सरकारद्वारे नागरिकांना प्रदान केले जाणारे अधिकृत दस्तऐवज आहे.
Ration Card
Ration CardDainik Gomantak
Published on
Updated on

New Ration Card Online And Offline Application

रेशन कार्ड हे भारत सरकारद्वारे नागरिकांना प्रदान केले जाणारे अधिकृत दस्तऐवज आहे. जे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत अनुदानित धान्य, साखर, रॉकेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जाते.

अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सर्वात गरजेचं म्हणजे केंद्र सरकारची मोफत अन्नधान्य योजना. याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेतचं आहे. रेशनकार्ड नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल, तर तुम्ही ते ताबडतोब बनवून घ्यावं. अन्यथा शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल.

Ration Card
PM Kisan: पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख जाहीर; 'या' तारखेला खात्यात जमा होणार पैसे

रेशन कार्डचे प्रकार

भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त चार प्रकारचे रेशन कार्ड असतात. या रेशन कार्डची ओळख त्यांच्या रंगानुसार होते. निळे, गुलाबी, पांढरे आणि पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड असते. उत्पन्न गटानुसार, मिळकत, कमाईनुसार हे रेशन कार्ड देण्यात येते.

पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड : ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे त्यांना हे रेशन कार्ड दिले जाते. या कार्डधारकांना सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत अत्यंत स्वस्त दरात धान्य, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळतात.

केशरी रंगाचं रेशन कार्ड : आर्थिकदृष्ट्या कमी सक्षम कुटुंबांसाठी हे रेशन कार्ड दिलं जातं. या कार्डधारकांना सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत सवलतीत धान्य, साखर, इत्यादी जीवनावश्यक वस्तू दिली जातात.

पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड: पांढऱ्या रेशन कार्डधारकांना सवलतीत धान्य किंवा इतर वस्तू मिळत नाहीत, पण ते सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत काही सुविधांचा वापर करू शकतात. पांढऱ्या रेशन कार्डधारकांना इतर रेशन कार्डधारकांच्या तुलनेत कमी सवलती मिळतात.

Ration Card
Goa Crime: गाडी विकण्याच्या बहाण्याने 'इन्स्टा'वर केला मेसेज, तोतया कॉन्स्टेबलने घातला 67 हजारांना गंडा

नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा? How To Apply For Ration Card

ऑनलाइन पद्धत

  • राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • नोंदणी करा आणि लॉग इन करा.

  • रेशन कार्ड अर्ज फॉर्म भरा.

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  • फी भरून अर्ज सबमिट करा.

  • अर्जाचा स्टेटस ऑनलाइन तपासा.

ऑफलाइन पद्धत

  • नजीकच्या शासकीय रेशनिंग कार्यालयात भेट द्या.

  • रेशन कार्ड अर्ज फॉर्म घ्या आणि पूर्ण भरा.

  • सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करा.

  • फी भरल्यास पावती मिळवा.

  • अर्जाच्या स्थितीबद्दल कार्यालयात चौकशी करा.

आवश्यक कागदपत्रं

  • आधार कार्ड

  • ओळखपत्र (मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)

  • रहिवासी पुरावा (वीज बिल, पाणी बिल, भाडेकरार)

  • उत्पन्न प्रमाणपत्र

  • पासपोर्ट साइज फोटो

रेशन कार्डचे फायदे Ration Card Benefits

  • अनुदानित दराने धान्य मिळते.

  • विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येतो.

  • ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते.

  • पासपोर्ट, पॅन कार्ड, बँक खाते उघडण्यासाठी उपयुक्त.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com