ट्रेन रुळावरुन घसरली तर पुन्हा रुळांवर कशी आणली जाते? प्रत्यक्ष व्हिडिओ पाहा Watch

How trains are put back on track Practical Video: रेल्वे घरसल्यानंतर लोह मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत होते त्यामुळे रेल्वे तातडीने पुन्हा रुळावर घेऊन यावी लागते. यासाठी एका खास पद्धत वापरली जाते.
Train derailment recovery process Explained in Video
How trains are put back on track VideoDainik Gomantak
Published on
Updated on

रुळावरुन घसरल्याने ट्रेनचा अपघात झाल्याच्या घटना विविध ठिकाणांवरुन समोर येत असतात. जून २०२३ मध्ये ओडिशात झालेल्या तीन ट्रेनच्या अपघातात १०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर, अनेकजण जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रेन रुळावरुन हटवणे किंवा पुन्हा रुळांवर आणणे तसे जोखमीचे आणि आव्हानात्मक काम असते.

बऱ्याचवेळा वेगाने धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन, मालगाडी किंवा लोकल देखील रुळावरुन खाली घसरु शकते. ट्रेन रुळावर घसरल्यानंतर तिला पुन्हा रुळावर घेऊन आणण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि अभियंत्यांना काम करावे लागते. यानंतर त्या रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत होते त्यामुळे रेल्वे तातडीने पुन्हा रुळावर घेऊन यावी लागते. यासाठी एका खास पद्धत वापरली जाते.

Train derailment recovery process Explained in Video
भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

घसरलेल्या रेल्वेला पुन्हा रुळावर घेऊन येण्यासाठी रुळांना जोडूनच रेल्वेच्या चाकांना दिशा देणारे खोलगट अशी खास रचना केलेला लोखंडी तुकडा (व्हिडिओत दिसत असलेला पिवळा रंगाचा पीस) वापरला जातो. रुळावर तो व्यवस्थित बसवला जातो. दोन्ही रुळांवर व्यवस्थित बसवल्यानंतर इंजिनच्या मदतीने घसरलेले डब्बे ओढले जातात. घसरलेली रेल्वे हळू हळू त्या तुकड्यावरुन रुळावर येऊ लागते. अशा पद्धतीने सर्व डब्बे रुळांवर घेतले जातात.

Train derailment recovery process Explained in Video
Supreme Court: काहींना तुरुंगात टाकल्यास धडा मिळेल, काडीकचरा जाळणाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका

भारतात अलिकडे रुळावरुन ट्रेन घसरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात अशा घटना घडतात. यानंतर रेल्वे प्रशासन रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करतात.

भारतात जून २०२३ मध्ये कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा बंगळुरु एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात ओडिशात भीषण अपघात झाला होता. यात १०० प्रवासी मृत्युमूखी पडले होते तर, जवळपास १००० जण जखमी झाले होते. त्यानंतर अगरतळा ते सीलडा दरम्यान धावणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसचा जून २०२४ मध्ये अपघात झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com