"घरातील सर्व कामं करणं फक्त पत्नीचीच जबाबदारी नाही", हायकोर्टाने पतीला फटकारले

पत्नी सतत फोनवर आईशी बोलत असते, घरचे कोणतेही काम करत नाही. त्यामुळे रोज सकाळी जेवण न करता कामावर जावे लागते, या कारणावरून पतीने घटस्फोट मागितला होता.
'Housework is not just the wife's responsibility', Says Bombay High Court While Rejecting divorce petition.
'Housework is not just the wife's responsibility', Says Bombay High Court While Rejecting divorce petition.Dainik Gomantak

'Housework is not just the wife's responsibility', Says Bombay High Court While Rejecting divorce petition:

आधुनिक समाजात घरातील जबाबदाऱ्यांचे ओझे फक्त पत्नीनेच न उचलता पतीनेदेखील उचलले पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने 35 वर्षीय व्यक्तीचा घटस्फोटासाठी केलेला अर्ज फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले. पतीवर पत्नीकडून क्रूरता होत असल्याचा दावा पती सिद्ध करू शकला नाही, असेही न्यायमूर्तींनी सांगितले.

पत्नी सतत फोनवर आईशी बोलत असते, घरचे कोणतेही काम करत नाही. त्यामुळे रोज सकाळी जेवण न करता कामावर जावे लागते, या कारणावरून पतीने घटस्फोट मागितला होता.

याव्यतिरिक्त, त्याने आरोप केला की त्याची पत्नी त्याच्याशी योग्य पद्धतीने वागत नाही आणि तसेच आई-वडिलांना शिवीगाळ करत असे.

दोन्ही पती-पत्नी नोकरीला आहेत आणि फक्त पत्नीनेच घरातील सर्व कामे करावीत अशी अपेक्षा करणे ही प्रतिगामी मानसिकता दिसून येते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाने असेही निरीक्षण केले की, पत्नीने लग्नानंतर तिच्या पालकांशी असलेले सर्व संबंध तोडण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.

एखाद्या विवाहीत महिलेने आई-वडिलांच्या संपर्कात राहणे म्हणजे पती किंवा सासू-सासऱ्यांना मानसिक त्रास देणे असे होत नाही. आमच्या मते, तिच्या पालकांशी संपर्क कमी करण्यासाठी तिच्यावर निर्बंध घालणे, म्हणजे तिच्यावर मानसिक क्रूरता करणे असे झाले.
न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख
'Housework is not just the wife's responsibility', Says Bombay High Court While Rejecting divorce petition.
बहीण 'कुटुंबाचा' भाग नसते, मृत भावाच्या जागी नोकरी मिळू शकत नाही: हायकोर्टाचा निर्णय

या जोडप्याने 2010 मध्ये बिहारमध्ये हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले आणि त्यानंतर मार्च 2011 मध्ये पुण्यात कोर्ट मॅरेज केले होते. त्यांना 2013 मध्ये एक मूल झाले. मात्र, काही समस्यांमुळे ते 2013 पासून वेगळे राहू लागले.

पतीने पत्नीला कायदेशीर नोटीस पाठवून तिला एकत्र राहण्याची मागणी केली. मात्र, पत्नीने यास नकार दिल्यावर, पतीने घटस्फोटासाठी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

'Housework is not just the wife's responsibility', Says Bombay High Court While Rejecting divorce petition.
शस्त्र प्रशिक्षणासाठी मंदिर परिसर वापरता येणार नाही, हायकोर्टाचे निर्देश

पत्नीशी पुन्हा एकत्र राहत संसार करण्यासाठी पतीने कोणतेही खरे आणि प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. कौटुंबिक न्यायालयाने अर्ज फेटाळून लावताना असे मत व्यक्त केले.

पतीवर क्रूरता झाल्याचे तो सिद्ध करू शकला नाही, असे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले.

"आमच्या मते, क्रूरता सामान्यत: वारंवार घडणाऱ्या कृत्यांच्या मालिकेचा संदर्भ देते ज्यामुळे अन्याय झालेल्या पक्षाला असा मानसिक किंवा शारीरिक त्रास होतो की न्यायालयाला घटस्फोट मंजूर पर्याय उरत नाही, पण या प्रकरणात तसे नाही," असे कोर्टाने अपील फेटाळताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com