Sengol In New Parliament: नव्या संसद भवनात स्थापन होणाऱ्या सेंगोलचे महत्त्व जाणून घ्या

Amit Shah on Sengol : संसद भवनाच्या उद्घाटनासोबतच एक ऐतिहासिक परंपरा देखील पुनरुज्जीवित केली जाईल. या परंपरेला सेंगोल म्हणतात, ही युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे.
New Parliament Building Inauguration Historic Sceptre Sengol
New Parliament Building Inauguration Historic Sceptre SengolDainik Gomantak
Published on
Updated on

New Parliament Building Inauguration Historic Sceptre Sengol

येत्या 28 मे रोजी दिल्लीतील नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी संसद भवनात सेंगोलची (राजदंड) स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी दिली.

अमित शाह म्हणाले की, संसद भवनाच्या उद्घाटनासोबतच एक ऐतिहासिक परंपरा देखील पुनरुज्जीवित केली जाईल. या परंपरेला सेंगोल म्हणतात, ही युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. (Historic Sceptre Sengol)

सेंगोल याचा अर्थ संपत्तीने संपन्न असा होतो. नवीन संसद भवनात ते स्पीकरच्या आसनाजवळ बसवले जाईल. संसद भवनात बसवण्यात येणार्‍या सेंगोलच्या शिखरावर नंदी विराजमान आहे

सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक

सेंगोलचा इतिहास खूप जुना आहे. स्वतंत्र भारतात याला खूप महत्त्व आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताकडे सत्ता हस्तांतरित झाली तेव्हा ती या सेंगोलने केली होती. एक प्रकारे सेंगोल हे भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्यावेळी सेंगोल हे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनले.

1947 मध्ये जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंडित नेहरूंना विचारले की सत्ता हस्तांतरित कशी करावी. यासाठी पंडित नेहरूंनी सी राजा गोपालाचारी यांचा सल्ला घेतला. सेंगोल प्रक्रियेबद्दल त्यांनी माहिती दिली. यानंतर ते तामिळनाडूहून आणण्यात आले आणि मध्यरात्री पंडित नेहरूंनी ते स्वीकारले.

संस्कृत शब्द "संकु" पासून आला सेंगोल

संस्कृत शब्द "संकु" पासून सेंगोल हा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ "शंख" आहे. हिंदू धर्मातील शंख ही एक पवित्र वस्तू होती आणि ती बहुधा सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून वापरली जात असे. सेंगोल (राजदंड) हे भारतीय सम्राटाच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक होते.

हे सोन्याचे किंवा चांदीचे असायचे आणि बहुधा मौल्यवान रत्नांनी सजवलेले अले. सेंगोल राजदंड सम्राट औपचारिक प्रसंगी घेऊन जात असे आणि त्याचा वापर त्याच्या अधिकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जात असे.

New Parliament Building Inauguration Historic Sceptre Sengol
UPSC Result : दोन आयेशा, रोल नंबर एकच, 184 व्या रॅंकवर दोघींचाही दावा

मौर्य साम्राज्याकडून सेंगोलचा पहिल्यांदा वापर

भारतातील सेंगोल राजदंडाचा इतिहास प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो. सेंगोल राजदंडाचा पहिला ज्ञात वापर मौर्य साम्राज्याने (322-185 BCE) केला होता.

मौर्य सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावर त्यांचा अधिकार दर्शविण्यासाठी सेंगोल राजदंडाचा वापर केला. गुप्त साम्राज्य (320-550 AD), चोल साम्राज्य (907-1310 AD) आणि विजयनगर साम्राज्य (1336-1646 AD) यांनी देखील सेंगोल राजदंड वापरला होता.

New Parliament Building Inauguration Historic Sceptre Sengol
Bihar Cycle Scheme : बिहारची सायकल योजना 7  देशांमध्ये सुपरहिट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com