भारत चीन सीमाप्रश्नी आज दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक

भारत आणि चीन (India China LAC Issue) यांच्यात उच्च स्तरीय लष्करी चर्चेची आणखी एक फेरी आज पार पडणार आहे.
High Level meeting on India China LAC Issue Moldo border point
High Level meeting on India China LAC Issue Moldo border pointDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि चीन (India China LAC Issue) यांच्यात उच्च स्तरीय लष्करी चर्चेची आणखी एक फेरी आज पार पडणार आहे. ज्यामध्ये पूर्व लडाखमधील (Ladakh) संघर्षाच्या उर्वरित ठिकाणाहून सैन्य माघार घेण्याच्या प्रक्रियेत काही प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) चीनच्या (China) बाजूला मोल्दो सीमेवर (moldo border point) सकाळी 10.30 वाजता चर्चा सुरू होईल. आजच्या चर्चेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह स्थित 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन करणार आहेत.(High Level meeting on India China LAC Issue Moldo border point)

भारतीय पक्षाने डेपसांग बुल्गे आणि डेमचोक येथे समस्यांचे निराकरण करण्यासाठी चर्चा करणे अपेक्षित आहे, याशिवाय संघर्षाच्या उर्वरित ठिकाणावरून लवकरात लवकर सैन्य मागे घेण्याची मागणी केली आहे. 31 जुलै रोजी दोन्ही देशांमधील चर्चेची 12 वी फेरी झाली होती . चर्चेनंतर काही दिवसांनी, दोन्ही सैन्याने गोगरामध्ये सैन्य मागे घेणे पूर्ण केले, जे या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात होते.

अशातच चीनच्या सैन्याने मागील काही दिवसात सीमेवर घुसखोरीच्या दोन घटना घडल्या आहेत आणि त्यातच आता चर्चेची 13 वी फेरी होणार आहे. या घटना उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये आणि इतर अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये घडल्या होत्या. गेल्याच आठवड्यात अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यांग्त्झीजवळ भारतीय आणि चिनी सैन्याची थोडीशी चकमक झाली आणि प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार दोन्ही बाजूंच्या स्थानिक कमांडर्समध्ये झालेल्या चर्चेनंतर तो सोडवण्यात आला होता .

High Level meeting on India China LAC Issue Moldo border point
त्यांचे मृत्यू म्हणजे 'एक्शन ची रिएक्शन' राकेश टिकैतांचे वादग्रस्त विधान

दुसरीकडे एका महिन्यापूर्वीही उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये सुमारे 100 चीनी सैनिकांनी LAC ओलांडल्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकीची घटना घडली होती. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी शनिवारी सांगितले की, लडाखच्या पूर्व भागात चीनकडून लष्करी बांधणी आणि मोठ्या प्रमाणावर तैनातीसाठी नवीन पायाभूत सुविधांचा विकास हा चिंतेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com