
Hardik Pandya Wicket Video: आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा सामना ओमान संघासोबत सुरु आहे. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाने लवकरच तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. विशेष म्हणजे, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनेमुळे रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
दरम्यान, सामन्याची सुरुवात टीम इंडियासाठी निराशाजनक झाली. सलामीवीर शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो फक्त 5 धावा करुन क्लीन बोल्ड झाला. संघाची धावसंख्या 6 असतानाच भारताने पहिली विकेट गमावली. यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. अभिषेकने 15 चेंडूंमध्ये 38 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात चौकार आणि षटकारांचा मारा केला. मात्र, मोठी खेळी खेळण्याच्या नादात तो ही बाद झाला.
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पांड्याला संघ व्यवस्थापनाने बढती दिली होती. तो मोठी खेळी खेळून संघाला अडचणीतून बाहेर काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, हार्दिक पांड्याला आपल्या नशिबाने साथ दिली नाही.
हार्दिकने नुकतेच आपले खाते उघडले होते आणि तो नॉन-स्ट्रायकरवर उभा होता. त्यावेळी स्ट्राइकवर असलेल्या संजू सॅमसनने एक जोरदार स्ट्रेट ड्राइव्ह शॉट मारला. संजूने मारलेला हा शॉट इतका वेगवान होता की, चेंडू स्टंपच्या दिशेने गेला. दुर्दैवाने, गोलंदाजाच्या हाताला स्पर्श होऊन तो थेट स्टंप्सला लागला. या घटनेमुळे हार्दिक पांड्याला आपली विकेट गमवावी लागली. संजूच्या शॉटमुळे हार्दिक रन आऊट झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.