Hanuman Jayanti Special: देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह, देखणी कलाकृती बनवत सँड आर्टिस्टने बजरंगबलीला केले अनोखे वंदन

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जात आहे
Hanuman Jayanti at Puri Beach
Hanuman Jayanti at Puri BeachDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Hanuman Jayanti at Puri Beach: दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जात आहे. सकाळपासूनच भाविकांमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह दिसून येत आहे.

हनुमानजींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.

हनुमानाची सुंदर वाळूची मूर्ती

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर भगवान हनुमानाचे एक सुंदर वाळूचे शिल्प तयार केले आहे.

त्यांनी वाळूच्या माध्यमातून भगवान हनुमानाचे अत्यंत अनोखे रूप साकारले आहे. त्याचबरोबर कलाकृतीत काही रंग भरून ते अधिक सुंदर केले आहे. हनुमान जयंतीनिमित्त देशभरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर देशभरातून सुंदर फोटो समोर येत आहेत. मारुतीचे मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवली आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील हनुमान जयंतीनिमित्त पचमाथा मंदिरात (Temple) भगवान हनुमानाला एक टन वजनाचे लाडू अर्पण केले जातात.

मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे दिल्लीतील कश्मिरे गेट येथील मार्गघाट हनुमान मंदिरात सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी पोहोचले. त्याचवेळी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात मोठ्या संख्येने भाविक लांब रांगेत उभे आहेत.

देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली

रामनवमीच्या दिवशी भारतातील हिंसाचार लक्षात घेऊन पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने सर्व राज्यांना सुरक्षा कडेकोट ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. ते बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बदमाशांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी कटिबद्ध आहे. पश्चिम बंगालमधील हनुमान जयंती उत्सवापूर्वी पोलिसांनी हुगळीत फ्लॅग मार्च काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com