Breaking: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा राजिनामा

पार्टी जी जबाबदारी देणार ती मी स्विकारणार
Vijay Rupani
Vijay RupaniDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गुजरातचे मुख्यमंत्री (Gujrat CM) विजय रूपानी (Vijay Rupani) यांनी आज राजिनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा राजिनामा दिला. कोविड काळात गुरजातला ज्या डॉक्टर, पोलिस आणि सगळ्या कोविड वॉरियर्सनी सपोर्ट केला त्यांचे आभार व्यक्त करत त्यांनी राजानामा दिल्याची माहिती मिडियाला दिली.

"माझी कोणत्याही संघटनेबाबत तक्रार नाही. लवकरच गुजरातला नवे नेतृत्व मिळेल. मला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार पदाचा राजीनामा देवून पक्ष संघटनेसाठी काम करणार. आता मला पार्टी जी जबाबदारी देणार ती मी स्विकारणार असेही पंतप्रधानंच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारी निवडणूक लढवू." असे रूपानी यांनी सांगितले.

"केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सतत पाठिंबा मिळाला आहे. माझ्या राजीनाम्यामुळे नव्या नेत्याला ही जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळेल, मला 5 वर्षांसाठी जबाबदारी देण्यात आली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हे पुरेसे आहे," असेही रुपानी म्हणाले.

Vijay Rupani
दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी, 11 वर्षामध्ये विक्रमी पावसाची नोंद

"भाजप पुढील निवडणूक पूर्ण जोमाने लढेल आणि निवडणुकीत विजयाची गुडी उभारेल. मला ही जबाबदारी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. पक्ष वेगवेगळ्या वेळी जबाबदाऱ्या बदलत राहतो आणि याच काळात मी राजीनामा दिला आहे. गुजरातच्या विकासासाठी आम्ही प्रत्येकजण एकजुटीने काम करू," असे रूपानी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Telangana Kamareddy ATM Robbery
Greater Noida Delivery Riders Fight
CJP Ashutosh Ranka press conference
Supreme Court Delhi barricades
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com