नवी दिल्ली: दिल्ली (Delhi) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) राजधानीत शाळा (School) उघडण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरणाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना (schools and colleges) आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कॅम्पसमध्ये अलग ठेवण्याची खोली स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. गर्दी टाळण्यासाठी शाळांना लंच ब्रेकसाठी मोकळी जागा दिली पाहिजे. तसेच शाळांमध्ये नियमित पाहुण्यांची उपस्थिती कमी केली पाहिजे. याशिवाय, डीडीएमएने (DDMA) आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, अशा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयात येऊ देऊ नये जे प्रशासनाने निर्धारित केलेल्या कोणत्याही कंटेनमेंट झोनमध्ये राहत आहेत.
दिल्लीत शाळा 1 सप्टेंबर 2021 पासून सुरु होत आहेत. 9 वी ते 12 वीच्या वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळेची घंटा वाजणार आहे. 6 सप्टेंबरपासून मध्यम वर्गाला म्हणजेच 6 वी ते 8 वी पर्यंत शाळेत बोलावले जाऊ शकते. तथापि, शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची लेखी संमती घ्यावी लागते आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास भाग पाडले जाणार नाही.
DDMA ची इतर काही महत्वाची मार्गदर्शक तत्त्वे
· शैक्षणिक संस्थांना एका वेळी वर्गात जास्तीत जास्त 50 टक्के विद्यार्थ्यांना परवानगी असेल.
· यासाठी, संस्था विद्यार्थ्यांना शिफ्टमध्ये बोलवू शकते. दोन शिफ्टमध्ये किमान एक तासाचे अंतर असले पाहिजे.
· विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा पाणी, पुस्तके, स्टेशनरी किंवा इतर कोणतीही गोष्ट वर्गमित्र किंवा इतर कोणाशीही शेअर करणे टाळावे.
· शाळेच्या प्रमुखांनी हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की शाळेत उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असावे. ते जर झाले नसेल तर त्यांना ते प्राधान्याने करावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.