Bengal Governor Vs TMC: ‘राज्यपाल जगदीप धनखड़ बंगालचे दुश्मन'

संपादकीयात धनखर यांना बंगालचे शत्रू म्हटले असून त्यांना राज्यपालपदासाठी (Governor) अपात्र ठरवण्यात आले आहे.
West Bengal Governor Jagdeep Dhankhar

West Bengal Governor Jagdeep Dhankhar

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल जगदीप धनखर (West Bengal Governor Jagdeep Dhankhar) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. तृणमूलने ‘जागो बांगला’ (Jago Bangla) या मुखपत्रातून राज्यपालांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यात लिहिलेल्या संपादकीयात धनखर यांना बंगालचे शत्रू म्हटले असून त्यांना राज्यपालपदासाठी (Governor) अपात्र ठरवण्यात आले आहे.

दरम्यान, मुखपत्रातील संपादकीयात असे म्हटले आहे की, "राज्यपाल हे पद घटनात्मक आणि आदरणीय आहे, परंतु जर कोणी त्यावर बसून राजकीय पक्षासाठी काम करत असेल तर तो या घटनात्मक पदाचा अवमान आहे, आणि त्याला विरोध करणे आवश्यक आहे. जसे राज्यपाल जगदीप धनखर. भारतीय जनता पक्षासाठी प्राणवायू बनणे एवढेच त्यांचे काम आहे.

<div class="paragraphs"><p>West Bengal Governor Jagdeep Dhankhar</p></div>
Punjab Assembly Elections: काँग्रेसला मोठा धक्का, दोन आमदारांनी भाजपमध्ये केला प्रवेश

याशिवाय राज्यपाल धनखर यांच्या उत्तर बंगालच्या प्रवासावरही टोमणा मारण्यात आला आहे. संपादकीयमधून पक्षाने म्हटले की, “टेकड्यांवर शांतता परत आली असून ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) नेतृत्वात बंगालचा विकास झाला आहे. त्यामुळेच राज्यपाल तिथे शांततेत आणि बिनदिक्कतपणे फिरत आहेत. माकपची सत्ता असती तर ते हे करु शकले नसते कारण तेव्हा आंदोलनाच्या आगीत डोंगर जळत होता. भाजप नेते उत्तर बंगालचे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करतात तेव्हा राज्यपाल काहीच बोलत नाहीत. ते सातत्याने असंवैधानिक कक्षेबाहेर जाऊन काम करत आहेत. ते राज्यपालपदासाठी अयोग्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून वावरत आहेत. धनखर बंगालचे शत्रू आहे.

टीएमसी खासदारांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला

तृणमूलचे खासदार सुखेंदू शेखर रॉय म्हणाले, "ते वेड्यासारखा वागत आहे. राज्यपालांच्या नियुक्तीबाबत आपल्या मनात प्रश्न आहेत. ज्या पद्धतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते राजकारणी आहेत. भाजपसाठी काम करतात. कोणत्याही नियमांचे पालन न करता ही नियुक्ती करण्यात आली आहे. तृणमूल खासदाराच्या शब्दांत, “त्यांच्यावर फुटीरतावादी शक्तींकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. देशात विध्वंसक कारवायांमध्ये गुंतलेल्या विदेशी शक्तींकडून लाच घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अशा व्यक्तीला राज्यपाल केले गेले आहे का, असा आमचा प्रश्न आहे. आजपर्यंत योग्य उत्तर सापडलेले नाही. त्यांनी प्रथम त्यांची प्रतिमा साफ करावी.”

<div class="paragraphs"><p>West Bengal Governor Jagdeep Dhankhar</p></div>
Punjab Assembly Election: शेतकरी संघटनांनी निवडणूक लढवण्याची केली घोषणा

राज्यपाल आणि ममता सरकारमध्ये वाद वाढत आहे

विशेष म्हणजे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर हे सत्ताधारी पक्ष आणि राज्य सरकारच्या कार्यशैलीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विद्यापीठांच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू यांनी अलीकडेच सांगितले आहे. याचा खरपूस समाचार घेत राज्यपाल म्हणाले की, ममता यांना राज्यपाल बनवता येते की नाही हे मंत्र्यांनीही पाहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com