Gold Price Crash Alert! ग्राहकांना मोठा दिलासा: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Bullion Market Correction: जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दराने पुन्हा एकदा कूस बदलली आहे.
Bullion Market Correction
Bullion Market CorrectionDainiak Gomantak
Published on
Updated on

जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दराने पुन्हा एकदा कूस बदलली आहे. शुक्रवारी झालेल्या मोठ्या घसरणीमुळे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५८ लाख रुपयांच्या खाली घसरला आहे. शनिवारी बाजारात किमती काहीशा मर्यादित कक्षेत राहण्याचा अंदाज असून, वीकेंडला किमतींमध्ये फार मोठी वाढ किंवा घट होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील उच्चांकी दरांच्या तुलनेत झालेली ही घसरण खरेदीदारांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

आजचे सोन्याचे अचूक दर (प्रति १० ग्रॅम आणि प्रति ग्रॅम)

शुक्रवारच्या घसरणीनंतर आज शनिवारी सोन्याचे दर खालीलप्रमाणे स्थिर आहेत:

२४ कॅरेट सोने (शुद्ध सोने): ₹१,५७,९१० प्रति १० ग्रॅम (₹१५,७९१ प्रति ग्रॅम)

२२ कॅरेट सोने (दागिन्यांचे सोने): ₹१,४४,७५० प्रति १० ग्रॅम (₹१४,४७५ प्रति ग्रॅम)

१८ कॅरेट सोने: ₹१,१-[८,४३० प्रति १० ग्रॅम (₹११,८४३ प्रति ग्रॅम)

Bullion Market Correction
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या किमतीचा पुन्हा भडका! केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासूनच नवे दर लागू

चांदीची चमकही झाली कमी

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. या आठवड्यात चांदीने प्रति किलो ३ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर चांदीचा दर थेट २,९०,००० रुपये प्रति किलोग्राम (₹२९० प्रति ग्रॅम) वर खाली आला आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात झालेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चक्रावून टाकणारी आहे.

दरांमध्ये घसरण होण्याची ३ प्रमुख कारणे

सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीचे दर अचानक खाली येण्यामागे तीन मोठी जागतिक कारणे आहेत: कच्चे तेल आणि डॉलरची मजबुती: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (Crude Oil) महागले आहे, तर दुसरीकडे अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला असून किमती घसरल्या आहेत.

Bullion Market Correction
सोन्याच्या किमतीत तेजीचं 'महावादळ', दीड लाखांचा टप्पा फत्ते! गुंतवणूकदारांची चांदी, तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

अमेरिकन ट्रेझरी यील्डमधील वाढ: अमेरिकेत १० वर्षांच्या ट्रेझरी यील्डमध्ये (Treasury Yield) वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यासारख्या 'नॉन-यील्डिंग एसेट्स'मधून पैसे काढून इतरत्र गुंतवण्यास सुरुवात केली आहे.अमेरिका-चीन चर्चा आणि अनिश्चितता: बीजिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या राजकीय घडामोडींमुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे.

बाजाराचा पुढील अंदाज काय?

बाजार तज्ज्ञांच्या मते, शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस बाजार एका मर्यादित कक्षेत राहील. आठवडाभराच्या मोठ्या चढ-उतारानंतर वीकेंडला दरांमध्ये स्थिरता येण्याची अपेक्षा आहे. मात्र, भारतीय रुपया सध्या स्वतःच्या 'ऑल-टाइम लो' (सर्वकालीन नीचांकी) पातळीवर असल्याने देशांतर्गत किमतींवर त्याचा परिणाम होत राहील. त्यामुळे नवीन खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांनी बाजाराच्या हालचालींवर लक्ष ठेवून काही काळ थांबणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com