'ज्ञानवापी परिसर हिंदूंच्या ताब्यात द्या', नव्या याचिकेवर आज सुनावणी

विश्व वैदिक सनातन संस्थेचे सरचिटणीस किरणसिंह बिसेन यांनी ही याचिका दाखल केली आहे.
Gyanvapi Masjid
Gyanvapi MasjidDainik Gomantak
Published on
Updated on

ज्ञानवापीबाबत (Gyanvapi Masjid) न्यायालयात याचिकांची प्रक्रिया थांबत नाहीये. आता याप्रकरणी आणखी एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे. माहितीनुसार, दाखल याचिकेत ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. विश्व वैदिक सनातन संस्थेचे सरचिटणीस किरणसिंह बिसेन यांनी ही याचिका दाखल केली असल्याचे सांगितले जात आहे. (Give Gyanvapi Masjid premises to Hindus hearing on new petition today)

Gyanvapi Masjid
PM Kisan Yojana : ई-केवायसीची अंतिम तारीख आली जवळ

खरे तर, विश्व वैदिक सनातन संस्थेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस किरण सिंह बिसेन यांनी भगवान विश्वेश्वर विराजमान यांचे वकील म्हणून खटला दाखल केल्याचे म्हटले जात आहे. वादग्रस्त ज्ञानवापी संकुलातील भगवान विश्वेश्वराच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्याचा हा खटला आहे. याचबरोबर मशिदीचा घुमट पाडण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकाकर्त्याने यावेळई केली आहे. राखी सिंग आणि इतर महिलांनी दाखल केलेल्या केसपेक्षा हे प्रकरण जरा वेगळेच आहे.

ते काय मागतात बघूया...

1- संपूर्ण ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या ताब्यात द्या.

2- ज्ञानवापी संकुलात विश्वेश्वराच्या नित्य पूजेची व्यवस्था करा.

3- ज्ञानवापी संकुलात मुस्लिमांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घाला.

4- मशिदीचा घुमट पाडण्याचे आदेश जारी करा.

हे प्रकरण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवी दिवाकर यांनी सुनावणीसाठी स्वीकारले असून आज दुपारी दोन वाजता सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आली. याच न्यायमूर्तींनी ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचे आदेश याआधी दिले होते.

वाराणसी जिल्हा न्यायालयात (District & Sessions Court, Varanasi) मंगळवारी ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी वादावर सुनावणी झाली आहे. सुनावणीत जिल्हा न्यायाधीश अजयकुमार विश्वेश यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत सुनावनीची पुढील तारीख दिली आहे. आता 26 मे रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे तर सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सांगितले की मुस्लिम बाजूचा आदेश 7, नियम 11 (देखभाल) याचिकेवर 26 मे रोजी सुनावणी पार पडणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप घेत आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com