Free Scooty For Girls: नंबरात या अन् स्कूटी घ्या! 'या' राज्यात 12वी पास विद्यार्थीनींना मोफत स्कूटी, जाणून घ्या योजना

Tripura Government: अर्थमंत्री प्रणजित सिंह रॉय यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 27,654 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे.
Tripura Student
Tripura StudentDainik Gomantak
Published on
Updated on

Girls passing 12th will get scooty for free: अनेक राज्य सरकारांनी मुलींसाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकपाठोपाठ त्रिपुराचे अर्थमंत्री प्रणजित सिंह रॉय यांनीही 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

यामध्ये त्यांनी त्रिपुरातील मुलींसाठी एक खास योजना काढली आहे. चला जाणून घेऊया त्रिपुरा सरकारने मुलींसाठी कोणती नवीन योजना आणली आहे.

त्रिपुरा सरकारने 12वीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 100 मुलींना सरकारकडून स्कूटी देण्याची घोषणा केली आहे.

त्रिपुराचे अर्थमंत्री प्रणजित सिंह रॉय यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 27,654 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

Tripura Student
Delhi Rain Video: दिल्लीत पावसाने मोडला 41 वर्षांचा विक्रम; केवळ 12 तासांत पडला पूर्ण मान्सूनच्या 15 टक्के पाऊस

सरकारकडून या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारच्या कराची तरतूद नाही. मंत्री रॉय यांनी सांगितले की भांडवली गुंतवणूक 5,358.70 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करताना रॉय म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था आठ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे.

Tripura Student
Old Pension Scheme: ते पात्र आहेत पण...; असे म्हणत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

या मुलींना मिळणार स्कूटी

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर आरोग्य विमा योजना 'मुख्यमंत्री जन आरोग्य योजना-2023' (CM-JAY) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

मंत्री म्हणाले की राज्य सरकारचा 'CM-JAY' उर्वरित 4.75 लाख कुटुंबांना (ज्यांना आयुष्मान भारत अंतर्गत समाविष्ट नाही) कव्हर करेल.

याशिवाय उच्च शिक्षणातून बारावीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या १०० मुलींना सरकार मोफत स्कूटी देणार आहे. त्यासाठी 'मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना' सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.

पूर्वोत्तर विशेष पायाभूत सुविधा विकास योजना (NESIDS) अंतर्गत आगरतळा येथील गांधीघाट येथे 35 कोटींच्या अंदाजे खर्चासह पर्यटन आणि सांस्कृतिक संवर्धन केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com