Viral Video: 'बिहारपासून झारखंड वेगळा झाल्यामुळे प्रजासत्ताक दिन...'; तरुणीच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर घातलाय धूमाकूळ

Republic Day Viral Video: सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ, रिल्स, पोस्ट व्हायरल होतात.
Republic Day Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Republic Day Viral Video: सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ, रिल्स, पोस्ट व्हायरल होतात. या व्हिडिओंमध्ये अनेक जुगाडही पाहायला मिळतात. काही व्हिडिओंमध्ये असेही सीन पाहायला मिळतात जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत. याशिवाय, काही व्हिडिओंमध्ये लोकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील खतरनाक व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका मुलीला प्रश्न विचारतो. तो विचारतो की, आपण प्रजासत्ताक दिन (Republic Day) का साजरा करतो. या प्रश्नाचे उत्तर लहान मुलेही अगदी सहज देतात. शाळेत आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यसैनिक इत्यादींबद्दल शिकवले आहे. पण ही मुलगी प्रश्नाचे उत्तर देताना म्हणते की, 'झारखंड बिहारपासून वेगळा झाल्यामुळे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.' मुलीचे हे उत्तर ऐकून उपस्थित सगळेच अवाक होतात.

Republic Day Viral Video
Viral Video: पठ्ठ्यानं लाथ मारताच ATM मधून पडला पैशांचा पाऊस, नंतर काय झालं? तुम्हीच पाहा व्हिडिओ

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @Siimplymee1234 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दीदीने थोडे जास्त वाचले आहे भाऊ.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत अनेकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट करत लिहिले की, दीदीने इतके वाचायला नको होते. दुसऱ्याने लिहिले की, ती खूप प्रो आहे. तर तिसऱ्याने लिहिले की, तिने वाचले नसते तर बरे झाले असते. त्याचवेळी, अनेकांनी इमोजीद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com