बॉयफ्रेंडला घरात ठेवण्याची अट, बायकोने घातला नवऱ्याच्या हत्येचा घाट

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गाझीयाबदामधील क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस स्टेशन हद्दीतील बहरामपूर येथे एका प्लॉटमध्ये सापडलेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली मृताची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. सततच्या वादातून आरोपीने त्याचा खून करुन मृतदेह फेकून दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. महिलेची दिशाभूल केल्यानंतर पोलिसांनी रक्ताचे डाग काढण्यासाठी बेंजाडीन टेस्ट केली, त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचे गूढ उघड झाले.

एसीपी वेव्ह सिटी सलोनी अग्रवाल यांनी सांगितले की, शिवम असे मृताचे नाव आहे. तो मूळचा जालौनचा असून गाझियाबादच्या बहरामपूर येथे राहत होता. या हत्येप्रकरणी पत्नी प्रियांका आणि तिचा कथित बॉयफ्रेंड गर्जन यादव यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीने गळा आवळून आणि चाकूने वार करुन खून केला आणि नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून रिकाम्या प्लॉटमध्ये फेकून दिला.

Crime News
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! चहा मिळण्यास उशीर झाल्याने पतीने तलवारीने केली पत्नीची हत्या

मुलीमुळे पत्नीच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्यास तयार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम हा बाईक कॅब चालवायचा. पहिल्या पत्नीला सोडून त्याने सुमारे 4 वर्षांपूर्वी प्रियंकासोबत लग्न केले. प्रियांकाला दोन वर्षांची मुलगी आहे. काही काळापूर्वी प्रियंका गर्जनच्या संपर्कात आली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मार्च 2023 मध्ये प्रियंका घर सोडून गर्जनकडे बलिया इथे राहण्यास गेली. दरम्यान तिचा शोध घेत शिवम बलिया येथे पोहोचला. दरम्यान, मुलीखातर तो आपल्या पत्नीच्या बॉयफ्रेंडला घरात ठेवण्यास तयार झाला.

त्यांच्या जवळीकतेमुळे वाद वाढला आणि त्याची हत्या करण्यात आली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम सहा महिन्यांपासून या दोघांसोबत राहत होता. मात्र, पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडची जवळीकता पाहून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. 20 डिसेंबरच्या रात्री प्रियंकाने शिवमचा गळा दाबला, गर्जनने त्याच्यावर चाकूने हल्ला करुन त्याची हत्या केली. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह चादरीत गुंडाळून घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या प्लॉटमध्ये फेकून दिला. यानंतर दोघांनीही घरी जाऊन रक्ताचे डाग साफ केले.

Crime News
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! आंध्र प्रदेशातील दाम्पत्याने 2 मुलांसह गळफास घेऊन संपवले जीवन

प्रकरणाचे गूढ उलगडले

एसीपी वेव्ह सिटी सलोनी अग्रवाल यांनी सांगितले की, हे प्रकरण खूपच आव्हानात्मक होते. यामध्ये पोलीस पथकाने 500 हून अधिक घरांना भेटी देऊन मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, एकदा पोलिसांचे पथक प्रियांकाच्या घरीही गेले होते, जिथे तिने गर्जनला ओळखण्यास नकार दिला होता. यानंतर याप्रकरणी अधिक माहिती मिळताच पोलिसांचे पथक पुन्हा तिच्या घरी गेले. यावेळी पोलिसांचे पथक फॉरेन्सिक टीमसोबत आले आणि मिटलेल्या रक्ताच्या डागांची बेंजाडीन टेस्ट केली. त्यानंतर रक्ताचे डाग निघाले आणि प्रकरणाचा उलघडा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Uttar Pradesh Double Murder News
Aligarh Murder Case Over Money
Fatehpur Police Half Encounter Sonu Yadav
Uttar Pradesh Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com