Ghaziabad: परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक, पाकिस्तानला पाठवायचा माहिती

Ghaziabad News: गाझियाबाद पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Arrested
ArrestedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ghaziabad News: गाझियाबाद पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. अहवालानुसार, नवीन पाल नावाच्या या व्यक्तीला क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातून पोलिसांनी इंटेलिजन्स ब्युरोकडून माहिती मिळाल्यानंतर अटक केली.

नवीन पाल याच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, त्याने परराष्ट्र मंत्रालयाची कागदपत्रे आणि G20 बैठकीशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानातील कराची येथील एका व्यक्तीला दिली. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचारी महिलेच्या संपर्कात आला

तपासादरम्यान नवीन पाल सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आल्याचे आढळून आले. त्यानंतर तो तिच्याशी व्हॉट्सअॅपवरुन बोलू लागला. सुरुवातीला महिलेचा नंबर उत्तर प्रदेशातील बरेलीचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, नंबरचा आयपी अॅड्रेस ट्रेस केल्यावर तो कराचीचा असल्याचे निष्पन्न झाले.

Arrested
Uttar Pradesh: टोमॅटोला 'झेड सुरक्षा', तैनात केले 2 बाऊन्सर; बाप-लेकाला पोलिसांकडून अटक

दुसरीकडे, नवीनच्या मोबाईलवर परराष्ट्र मंत्रालय आणि G20 संबंधित अनेक कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. या फाईल्स 'सिक्रेट' नावाने सेव्ह करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, पोलिसांनी सांगितले की, ते राजस्थानमधील (Rajasthan) अलवर येथील एका महिलेचा शोध घेत आहेत, जिने नवीनच्या खात्यात काही रक्कम डिजिटली ट्रान्सफर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Rejects Pakistan China Joint Boundary Commission
Goa Conversion Bill
Colvale Jail Drugs Racket
Ghaziabad Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com