Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

Gautam Gambhir Angry on Oval's Chief Curator: ३१ जुलैपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर यांच्यात वाद झाला.
Gautam Gambhir Fight
Gautam Gambhir FightDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात आणि ओव्हल स्टेडियमच्या पिच क्युरेटरमध्ये जोरदार वाद झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

ही घटना मंगळवारी दुपारी घडली. भारतीय संघाच्या व्यवस्थापनासोबत मैदानावर पाहणी करत असताना गंभीरने ओव्हल ग्राउंड स्टाफकडून पाहुण्या संघासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांवर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर वादाला तोंड फुटले.

टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, सुरुवातीला गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यातील संवाद शांततेत सुरू झाला होता. मात्र काही मुद्द्यांवर मतभेद उघड झाल्यानंतर गंभीरचा स्वर आक्रमक झाला. भारतीय संघासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून न दिल्याचा गंभीर आरोप करत होता. त्याने वारंवार ग्राउंड स्टाफवर बोटं दाखवत आवाज चढवला आणि वाद अधिक चिघळला.

Gautam Gambhir Fight
Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

वाद इतका वाढला की ओव्हल ग्राउंड स्टाफने थेट गौतम गंभीरविरुद्ध तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. मात्र, गंभीरनेही सडेतोड प्रत्युत्तर देत स्पष्टपणे सांगितले, “तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे तिथे करा, पण तुम्ही आम्हाला काय करायचं ते शिकवू नका.” त्यानंतर वातावरण क्षणभर तणावपूर्ण बनले. वाद मिटवण्यासाठी फलंदाज प्रशिक्षक सीतांशू कोटक आणि इतर सपोर्ट स्टाफने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Gautam Gambhir Fight
Goa Panchayat: पंचायतींना जीआय फंड देताना दुजाभाव का? सरदेसाईंचा सवाल; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेधले लक्ष

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना गुरुवार, ३१ जुलैपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सोमवारीच लंडनमध्ये दाखल झाला असून, मालिकेत सध्या १-२ अशा पिछाडीवर आहे. ही अंतिम कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

मात्र सामन्यापूर्वीच निर्माण झालेला हा तणाव संघाच्या तयारीवर परिणाम करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशिक्षक गंभीर यांची नाराजी, ओव्हल ग्राउंड स्टाफचा आक्रमक पवित्रा आणि पिचविषयक परिस्थिती यामुळे या सामन्याची पार्श्वभूमी आधीच गरम झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com