Video: ‘मी आई-वडील नसलेली मुल आहे…मला वाचवा’, दिवाळीच्या रात्री तरुणीवर सामूहिक बलात्कार

Gangrape In Agra Hotel: संपूर्ण देश रविवारी रात्री दिवाळीचा सण साजरा करण्यात मग्न झाला होता.
Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Gangrape In Agra Hotel: संपूर्ण देश रविवारी रात्री दिवाळीचा सण साजरा करण्यात मग्न झाला होता. फटाक्यांचा आवाज आणि लोकांचा आनंद सर्वत्र ऐकू येत होता, पण त्याच दरम्यान, आग्रा, यूपीमध्ये फटाक्यांच्या आवाजासोबतच अचानक एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला. जेव्हा लोक या आरडाओरड्याच्या मदतीने मुलीपर्यंत पोहोचले आणि यामागचे कारण जाणून घेतले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

काल रात्री आग्रा येथून एका मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सामूहिक बलात्कार पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ पाठवण्यात आले. त्याचबरोबर घटनास्थळावरुन पोलिसांनी 5 आरोपींना अटकही केली.

घटनेनंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला

हे संपूर्ण प्रकरण आग्राच्या ताजगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे, जिथे ही घटना काल रात्री रिच होम स्टे हॉटेलमध्ये घडली. पोलिसांना माहिती देताना पीडित मुलीने सांगितले की, ती हॉटेलमध्ये थांबली असताना चार तरुण आणि एका महिलेने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होऊ लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ताजगंज परिसरातील दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करायची. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यासोबतच या प्रकरणी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करुन पाचही आरोपींना अटक केली. पाच आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

Crime News
Uttar Pradesh Crime: पत्नीचे फेसबुक अकाउंट हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट, मारहाणीनंतर हाकलले घराबाहेर

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. या प्रकरणी माहिती देताना एसीपी सदर अर्चना सिंह यांनी सांगितले की, ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिच होम स्टे हॉटेलमध्ये (Hotel) एका मुलीवर बलात्कार आणि मारहाणीची घटना समोर आली आहे.

माहितीची दखल घेत पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि इतर गुन्ह्यांसह गंभीर कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल केला आणि 1 महिला आणि 4 पुरुषांसह एकूण पाच जणांना अटक केली.

Crime News
Uttar Pradesh Crime: माणूस म्हणावे की हैवान! प्रेमविवाह केलेल्या पत्नी आणि आठ महिन्याच्या मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या

दुसरीकडे, आग्राच्या ताजनगरी फेज 2 मधील एका सोसायटीच्या बाहेर असलेल्या फ्लॅटचा व्हिडिओ रात्री उशिरापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक एका मुलीला खोलीत ओढत असून जवळचे लोक फक्त पाहत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसणारी पीडिता लोकांकडे वाचवण्यासाठी आर्त हाक देतानाही दिसत आहे. यादरम्यान ती मला आई-वडील नाहीत, मी आई-वडील नसलेली मुल आहे, प्लीज मला वाचवा असे म्हणताना ती दिसत आहे. दुसरीकडे, या प्रकरणी पोलिसांनी 4 पुरुष आरोपी रवी, जितेंद्र, मनीष आणि देव किशोर यांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com