
क्रिकेटच्या मैदानातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. माजी इंग्लिश क्रिकेटपटू वेन लार्किन यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. क्रीडा विश्वात नेड म्हणून प्रसिद्ध असलेले लार्किन बऱ्याच काळापासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९५३ रोजी युनायटेड किंग्डममधील रॉक्सटन नावाच्या एका छोट्या गावात झाला होता.
वेन लार्किन यांनी १९७९ ते १९९१ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघासाठी १३ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळले. या काळात त्यांच्या बॅटने २५ कसोटी डावांमध्ये २०.५४ च्या सरासरीने ४९३ धावा आणि २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४.६२ च्या सरासरीने ५९१ धावा केल्या. लार्किनचे कसोटीत तीन अर्धशतकं आणि एकदिवसीय सामन्यात एक शतक आहे.
केवळ इंग्लंडच नाही तर त्याने नॉर्थम्प्टनशायर, डरहॅम आणि बेडफोर्डशायरचे प्रतिनिधित्व देखील केले. येथे तो सलामीवीर फलंदाज म्हणून सहभागी झाला. दरम्यान, त्याची कामगिरी खूपच कौतुकास्पद होती.
लार्किनची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने एकूण ४८२ प्रथम श्रेणी आणि ४८५ लिस्ट ए सामन्यांमध्ये भाग घेतला. दरम्यान, प्रथम श्रेणी क्रिकेटच्या ८४२ डावांमध्ये त्याने ३४.४४ च्या सरासरीने २७१४२ धावा केल्या आणि लिस्ट ए च्या ४६७ डावांमध्ये त्याने ३०.७५ च्या सरासरीने १३५९४ धावा केल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५९ शतके आणि ११६ अर्धशतके
वेन लार्किनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५९ शतके आणि ११६ अर्धशतके आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये २६ शतके आणि ६६ अर्धशतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी कामगिरी २५२ होती, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये तो १७२ धावांवर नाबाद राहिले होते.
१३५८ डावांमध्ये ४१८२० धावा केल्या
लार्किनने यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत १३५८ डावांमध्ये ४१८२० धावा केल्या, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटचा समावेश आहे. या काळात, त्याच्या बॅटमधून एकूण ८६ शतके आणि १८५ अर्धशतके आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.