Subhash Singh Death: बिहारचे माजी मंत्री अन् भाजप आमदार सुभाष सिंह यांचे निधन

Bihar News: सुभाष सिंह दीर्घकाळ आजारी होते.
Subhash Singh Death
Subhash Singh DeathDainik Gomantak
Published on
Updated on

बिहार सरकारचे माजी सहकार मंत्री आणि गोपालगंज सदरचे चार वेळा आमदार राहिलेले सुभाष सिंह (Subhash Singh) यांचे दिल्ली एम्समध्ये निधन झाले. मंगळवारी सकाळी 4 वाजता दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुभाष सिंह हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले. सदर ब्लॉकच्या ख्वाजेपूर गावचे रहिवासी असलेले सुभाष सिंह हे भाजपच्या तिकीटावर सलग चार वेळा गोपालगंज सदरमधून आमदार राहिले आहेत.

Subhash Singh Death
लष्कर, RBI आणि पंतप्रधान भारतातील सर्वात विश्वासार्ह संस्था: सर्वेक्षण

किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांना गोपालगंज येथे आणण्यात आल्याचे आमदाराच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. सुभाष सिंह यांचा राजकीय प्रवास 1990 पासून सुरु झाला होता.

त्यानंतर ते गोपालगंजच्या युनियनचे अध्यक्ष होते. यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रात काम केले. सुभाष सिंह यांची लोकप्रियता पाहून भाजपने गोपाळगंज सदर विधानसभेचे आमदारकीचे तिकीट दिले. बिहार विधानसभा निवडणुकीत 2005, 2010, 2015 आणि 2020 मध्ये सलग आमदार निवडून आले. सलग चार वेळा आमदार राहिल्यानंतर एनडीए सरकारमध्ये त्यांना सहकारमंत्री करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com