''जयशंकर यांनी मला धमकी दिली की... वाईट परिणाम होतील''; नेपाळच्या पूर्व PM च्या आरोपांवर आता परराष्ट्रमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

India-Nepal Relations: कागदपत्रांमध्ये असे लिहिले होते की, एस. जयशंकर यांनी संविधान न बदलता लागू करण्याची धमकी दिली होती. आता या आरोपावर जयशंकर उघडपणे बोलले आहेत.
India Foreign Minister S Jaishankar
India Foreign Minister S JaishankarDainik Gomantak

India Foreign Minister S Jaishankar:

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी 19 सप्टेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत असलेले एस जयशंकर (India Foreign Minister S Jaishankar) यांच्यावर गंभीर आरोप केले तेव्हा भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. नेपाळच्या सातव्या संविधान दिनी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या (Communist Party of Nepal) स्थायी समितीसमोर काही राजकीय कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांमध्ये असे लिहिले होते की, एस. जयशंकर यांनी संविधान न बदलता लागू करण्याची धमकी दिली होती. आता या आरोपावर जयशंकर उघडपणे बोलले आहेत.

'द लॅलनटॉप'च्या 'जमघट' शोमध्ये या आरोपावर परराष्ट्रमंत्र्यांनी ओली यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'सप्टेंबर 2021... केपी शर्मा पक्षाच्या स्थायी समितीला सांगतात की जयशंकर यांनी मला आणि इतर पक्षांना इशारा दिला की जर या स्वरुपात संविधान (Constitution) लागू केले तर त्याचे वाईट परिणाम होतील. तुम्ही त्यांना इशारा दिला होता का?'

India Foreign Minister S Jaishankar
Amit Shah: लोकसभा निवडणुका देशाचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरवतील: अमित शहा

दरम्यान, या प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले की, 'हे बघा, राजकारणात लोक अनेक गोष्टी बोलतात जेव्हा त्यांना त्यातून काही राजकीय फायदा होतो. आमचे धोरण सुरुवातीपासूनच असे आहे की तुम्ही लोकांनी एकत्र बसून एकमत घडवावे... हिंसाचार थांबवा. राजकारणात लोक स्वतःच्या फायद्यासाठील ट्विस्ट करुन बोलतात, ते घडते... ठीक आहे.

India Foreign Minister S Jaishankar
Supreme Court: CAA ला स्थगिती नाही! 200 हून अधिक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; आता 9 एप्रिलला सुनावणी

त्याचवेळी, इंडियन एक्स्प्रेसमधील एका वृत्तात म्हटले आहे की, नेपाळने (Nepal) 2015 मध्ये आणलेल्या संविधानात भारताला 7 बदल हवे होते. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने हा रिपोर्ट फेटाळला होता. पण त्यानंतर 6 फेब्रुवारी 2016 रोजी नेपाळने आपल्या संविधानात भारताला हवे तसे बदल केले. जयशंकर यांनी मात्र भारताच्या वाढत्या दबावामुळे नेपाळने संविधान बदलल्याची सूचना नाकारली.

जयशंकर म्हणाले की, ''नाही, तसे काहीच नाही. वर्तमानपत्रांचे म्हणणे आहे की, त्यांना तुमच्याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. असे बोलणे हा त्या वृत्तपत्रांचा अधिकार आहे पण मला एवढेच सांगायचे आहे की आम्ही आमच्या शेजाऱ्यांना एकच सल्ला देतो की आम्हाला त्यांच्या देशात स्थिरता आणि प्रगती हवी आहे. आम्ही मदतही करायला तयार आहोत पण आम्हाला अस्थिरता, हिंसाचार, सीमेवर तणाव असावा असे वाटत नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com