Confirm Tatkal Ticket Booking: भारतीय रेल्वेच्या IRCTC च्या वेबसाईटवरून तत्काळ तिकिट बुक करणे अलीकडच्या काळात जिकिरीचे होते. तथापि, IRCTC च्या एका ऑप्शनद्वारे तुम्ही तत्काळ तिकीट बुक करू शकता. यासाठी तुम्हाला मास्टर लिस्ट फीचरचा वापर करावा लागेल. काय आहे हे फिचर याविषयी जाणून घेऊया.
सध्या सण-उत्सवाचा कालावधी सुरू आहे. अनेक चाकरमानी लोकांना स्वतःच्या गावी जाण्याची इच्छा असते. तथापि, रेल्वेचे तिकिट कन्फर्म नसल्याने त्यांची अडचण होत असते. या सीझनमध्येही वेटिंगमधील तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता कमीच आहे.
मागणी जास्त असल्याने अनेकदा प्रवाशांना तत्काळ तिकिट मिळत नाहीत. त्यासाठी मग प्रवासी एजंट्सच्या पाठीमागे लागतात. पण IRCTC च्या एका फिचरमुळे तुम्हाला आता एजंट्सच्या पाठीमागे लागण्याची गरज भासणार नाही. या ऑप्शनद्वारे कन्फर्म तिकिट मिळण्याची जास्त खात्री असेल.
IRCTC च्या मास्टर लिस्ट फीचरच्या वापराने तिकिट बुकिंग करतानाचा बराचसा वेळ वाचतो. मास्टर लिस्ट फिचरद्वारे तुम्ही आधीच प्रवाशांची नावे भरून ठेऊ शकता. त्यामुळे तिकिट बुक करताना तुम्हाला पुन्हा नावे टाईप करण्याची गरज नसते. केवळ ऑप्शनमध्ये सिलेक्ट करावे लागेल.
असे वापरा हे फीचर
सर्वात आधी IRCTC अॅप किंवा वेबसाईट ओपन करा. अकाऊंट लॉगिन करा. त्यानतंर दिलेल्या ऑप्शनमध्ये मास्टर लिस्ट फीचर का ऑप्शन सिलेक्ट करा. त्यात ज्यांचे तत्काळ तिकिट बूक करायचे आहे, त्यांचा तपशील भरावा. तत्काळ तिकिट बुकिंग सुरू झाल्यानंतर तुम्ही या मास्टर लिस्टमधून तुम्ही भरलेला तपशील सिलेक्ट करा.
पेमेंट करताना युपीआय ऑप्शन सिलेक्ट करा, त्यामुळेही खूप वेळ वाचेल. यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता अधिक वाढेल. तथापि, अनेकदा व्यग्र असलेल्या रेल्वेमार्गांमुळे कन्फर्म तिकिट बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. पण ही पद्धत बऱ्याचदा उपयोगी ठरते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.