देशात मान्सून (Monsoon) सुरु झाल्यापासुन अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सात जिल्ह्यांतील शेकडो गावांना पुराचा (Floods) तडाखा बसला आहे. राज्यातील शिवपुरी, दातिया, शेओपूर, भिंड, ग्वाल्हेर, गुना आणि मोरेना जिल्ह्यातील एकूण 1225 गावांतील जनजीवन पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहे. आतापर्यंत या जिल्ह्यांमधून 5800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तर 1400 लोक अजूनही पुरामध्ये अडकलेले आहेत.
SDRF च्या 29 आणि NDRF च्या 3 टीम पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहेत. ग्वाल्हेर, दतिया, शिवपुरी आणि शेओपूर जिल्ह्यांच्या सर्वाधिक प्रभावित भागात, लष्कराच्या 4 तुकड्या बचावकार्य करत आहेत. इंडीयन एअर फोर्सचे 4 हेलिकॉप्टर्स सुद्धा या बचावकार्यात सहभागी आहेत. दातिया जिल्ह्यात गेल्या 24 तासात सिंध नदीच्या उद्रेकामुळे तीन पूल वाहून गेले आहेत. यामुळे ग्वाल्हेर जिल्ह्यासह दतियाचा संपर्क तुटला आहे. सेवाडा पूल वाहुन गेला होता. तर दुसरीकडे पुलाला भेगा पडल्याने NH-3 देखील बंद आहे.
राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, आतापर्यंत 240 गावांमधून 5950 लोकांना वाचवण्यात यश आले आहे, तर 1950 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच NDRF, आर्मी आणि BSFच्या टीमसह एसडीआरएफच्या 70 टीम बचाव कार्यात गुंतलेल्या आहेत, तर हवाई दलाच्या टीमनेही आपले बचावकार्य पुन्हा सुरू केले आहे. शिवपुरी आणि ग्वाल्हेर जिल्ह्यात परिस्थिती सुधारत असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पार्वती नदीच्या पातळीत घट झाली असली तरी, कोरे बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे चंबळ नदीला वेग असल्याने मोरेना आणि भिंड जिल्हे चिंतेचे नवीन कारण झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, "चंबल नदीजवळील सखल भागातील नागरिकांना मोरेना आणि भिंड जिल्ह्यात सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे." दुसरीकडे, शेओपूर जिल्ह्यातील दूरसंचार पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुलाला तडा गेल्याने दातिया जिल्ह्यातील NH-3 वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.