असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम-मद्रासमधील सर्व उड्डाणे रद्द

चक्रीवादळ वायव्येकडे सरकून आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्यभागी येण्याची शक्यता
Flights
FlightsANI
Published on
Updated on

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘असानी’ चक्रीवादळ (Cyclone Asani) आता उत्तर-पश्चिम दिशेने वेगाने सरकत आहे. बुधवारी हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, काकीनाडामध्ये असनी चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत आणि समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ वायव्येकडे सरकून आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्यभागी येण्याची शक्यता आहे. (Cyclone Asani Impact)

काकीनाडा येथील थिम्मापुरम पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक रामा कृष्णा म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यालगतचा रस्ता खराब झाला आहे. या दिशेने दोन चेकपोस्ट टाकून वाहतूक थांबवली जात आह. आम्ही पूर्ण सतर्क आहोत. लोकांना बाहेर पडू नका, मासेमारी करू नका, अशी विनंतीही करण्यात आल्याची माहिती रामा कृष्णा यांनी दिली.

Flights
ओडिशाच्या दिशेने सरकले चक्रीवादळ, आंध्रामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस, किनारी भाग रिकामा

विशाखापट्टणम येथील विमानतळाचे संचालक के. श्रीनिवासन राव म्हणाले की, असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोचे सर्व उड्डाणे आज रद्द करण्यात आले आहे. AirAsia ने बेंगळुरूहून एक आणि दिल्लीहून एक फ्लाइट रद्द केली आहे. संध्याकाळच्या विमान प्रवासाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

एअर इंडियाने त्यांच्या उड्डाणे सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. स्पाईसजेटची कोलकाता-विशाखापट्टणम-कोलकाता उड्डाणे रद्द करण्यात आली आहे, तर हैदराबाद फ्लाइटबाबत निर्णय दुपारी 2 नंतर घेतला जाईल.

हे चक्रीवादळ 12 मे रोजी कमकुवत होईल. काल रात्री उशिरा भुवनेश्वरमधील विशेष मदत आयुक्त प्रदीप कुमार जेना यांनी सांगितले की, चक्रीवादळ असानी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरातून उत्तर आंध्र किनारपट्टीकडे सरकत आहे आणि चक्रीवादळ आंध्रमधील काकीनाडापर्यंत पोहोचेल.

Flights
लाऊडस्पीकरचे राजकारण कर्नाटकातही पोहोचले, जाणून घ्या नविन नियम

त्यानंतर विशाखापट्टणमपर्यंत आल्यानंतर ते पुन्हा समुद्रात येईल आणि या दरम्यान ते कमकुवत होईल. 12 मे रोजी सकाळी चक्रीवादळ कमकुवत होईल. आंध्र प्रदेशातील किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. तेलंगणातील नलगोंडा, सूर्यपेट, भद्राद्री कोठागुडेम, खम्मम आणि मुलुगु जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com