नवी दिल्लीतील(Delhi) लोधी रोडवरील सीबीआय(CBI Head Office) मुख्यालयात भीषण आग(Fire in CBI Office) लागल्याची घटना घडली आहे. पार्किंग एरियाच्या इलेक्ट्रॉनिक खोलीत ही आग लागली. आगीनंतर धूर वाढत असल्याचे पाहून सर्व अधिकारी तत्काळ इमारतीतून बाहेर आले पण वेळेतच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली गेली आहे.
सध्या ही आग आटोक्यात आणली गेली आहे.मात्र ही आग कशामुळे लागली याबद्दल आणखीनही कळू शकले नाही . शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्रथमदर्शनी दावा करण्यात आला आहे. मात्र चांगली गोष्ट अशी आहे की या आगीत कुठलाही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही.
सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास इमारतीत ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे , त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यास यश आले आहे . इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि वातानुकूलन प्लांटच्या खोल्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तर "शॉर्ट सर्किटमुळे सीबीआय इमारतीत जनरेटरमधून धूर बाहेर येत होता. आग व मालमत्तेचे नुकसान झाले नाही. धूरानंतर स्वयंचलित स्प्रिंकलर यंत्रणा सक्रिय झाली. कार्यालयीन काम चालू होते. काही वेळात हे काम पुन्हा सुरु केले जाईल."अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्याने दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.